सोनाली कुलकर्णी आणि पुष्कर जोग करणार एकत्र तिसरा चित्रपट, स्कॉटलंडमध्ये झाला शूटिंगला आरंभ

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) ही सध्या तिच्या व्यावसायिक आयुष्यात खूप व्यस्त आहे. तिचे एका मागून एक असे नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नुकतेच तिचे ‘झिम्मा‘ आणि ‘पांडू‘ हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. तिच्या या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसावर बक्कळ कमाई केली आहे. चित्रपटांना प्रेक्षकांनी देखील खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. अशातच सोनाली पुन्हा एकदा एका नवीन चित्रपटातून नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) हे लवकरच त्यांच्या आगामी चित्रपट एकत्र दिसणार आहेत. याची माहिती पुष्कर जोगने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली आहे.

पुष्कर जोगने इंस्टग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये त्याच्यासोबत सोनाली कुलकर्णी, आशय कुलकर्णी, विराजस कुलकर्णी असे कलाकार दिसत आहेत. त्याच्या हातात ‘व्हिक्टोरिया’ असे लिहिलेली एक पाटी दिसत आहे. हे फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “हे सांगताना मला खूप आनंद होत आहे की, या वर्षातील मी माझा तिसरा चित्रपट करत आहे. निर्माते आनंद पंडित यांच्यासोबतच हा तिसरा चित्रपट माझाही सहकलाकार सोनाली कुलकर्णी हिच्यासोबतचा हा तिसरा चित्रपट.” यासोबत त्याने चित्रपटात असणाऱ्या बाकी कलाकारांचा देखील नाम उल्लेख केला आहे. (sonalee kulkarni and pushakr jog will shoot third film of this year)

View this post on Instagram

A post shared by Pushkar Suhas Jog (@jogpushkar)

पुष्कर आणि सोनालीने याआधी ‘वेल डन बेबी’ आणि ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात काम केले आहे. आता ते त्यांचा ‘व्हिक्टोरिया’ हा तिसरा चित्रपट करण्यासाठी स्कॉयलँडला गेले आहेत. हीरा सोहल ही अभिनेत्री देखील या चित्रपटातून पदार्पण करत आहे. अशोक आणि विराजस कुलकर्णी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. आनंद पंडित, रूपा पंडित आणि पुष्कर जोग हे या चित्रपटाचे निर्माते आहेत, तर वैशल शाह हे सहनिर्माते आहेत. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न झाला असून लवकरच या बिग बजेट चित्रपटाची शूटिंग स्कॉटलंड येथे होणार आहे. त्यांचे चाहते या फोटोवर अनेक चाहते कमेंट करून त्यांना शुभेच्छा देत आहेत.

हेही वाचा :

नाटकाच्या रंगमंचावर झाला उमेश कामतचा वाढदिवस साजरा, व्हिडिओ शेअर करून मानले आभार!

अंकिताच्या लग्नात हळद खेळण्यासाठी अमृता खानविलकरने केले आवडत्या साडीला गुडबाय, म्हणाली…

‘तुमची मुलगी काय करते?’ मालिकेत मधुरा वेलणकर साकारणार अनोखी भूमिका, प्रोमो आला समोर

 

Latest Post