Tuesday, April 23, 2024

गरोदर सना खानची ‘अशी’ झालीये अवस्था, सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

टेलिव्हिजन आणि सिनेसष्टीतील ओळखीचा चेहरा म्हणजे सना खान होय. बिग बॉस, दाक्षिणात्य सिनेमे आणि बॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर अचानक तिने चित्रपटांपासून किंबहुना मनोरंजनविश्वपासून ब्रेक घेतला. याचे कारण सनाने इस्लाम धर्मासाठी बॉलिवूडला रामराम ठोकत असल्याचे सांगितले होते. पुढे तिने 2021 मध्ये अनस सय्यद सिंगबरोबर लग्न केल. आज जरी ती या ग्लॅमर जगात काम करत नसली तरी तिची लोकप्रियता खूप आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. सना खान विषयी काही अपडेट समोर आले आहेत.

सना खान (sana khan) आणि अनस सय्यद यांच्या घरी लवकरच एक छोटा पाहुणा येणार आहे. सनाला डाॅक्टरांनी जुलैमधील तारीख दिली आहे. सना तिच्या गरोदरपणाच्या काळातही सोशल मीडियैवर खूप सक्रिय दिसते. तिच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक अपडेट ती सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या सनाने तिच्या आईचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पोस्ट शेअर करताना सनाने लिहिले की, “माझी आई माझ्या बुटाच्या लेस बांधत आहे, जेणेकरून मला फिरायला जाता येईल. आईच्या प्रेमापेक्षा प्रामाणिक आणि निस्वार्थी प्रेम दुसरे कोणाचे नाही. तुमच वय कितीही असल तरी तुम्ही तुमच्या आईसाठी लहानच असतात. मी असच प्रेम माझ्या मुला देण्याचा प्रयत्न करू शकत नाही. पण मी थोडी जरी माझ्या आईसारखी होऊ शकले, तर ते पुरेसे असेल.” सनाने शेअर केल्या या व्हिडिओमध्ये ती बुरखा घालून बसली आहे. तिची आई तिच्या बुटाची लेस बांधत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saiyad Sana Khan (@sanakhaan21)

सनाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी खूप कमेंट केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, “तुम्ही तुमच्या आईवर खर प्रेम करत असाल तर, ही पोस्ट डिलीट करा.” दुसर्‍या युजरने लिहिले, “अल्लाह अल्लाह…ती गरोदर आहे…तिला लेस बांधता येत नाही म्हणून तिची आई तिला मदत करत आहे…परिस्थितीचा चुकीचा अर्थ लावणाऱ्या सर्वांना लाज वाटली पाहिजे.” तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. (actress sana khan could notb end during pregnancy her mother tied her shoelaces shared video)

अधिक वाचा- 
सीझेन खानसोबतच्या डेटिंगच्या बातम्यांवर श्वेता तिवारीची प्रतिक्रिया, म्हणाली,’मी त्याला…’
आमिर खानसोबत पदार्पण करूनही नाही मिळालं यश, कपिल शर्माची ‘ऑनस्क्रीन’ पत्नी बनत सुमोनाने कमावलं नाव

हे देखील वाचा