Thursday, March 28, 2024

सोनम कपूरच्या आयुष्यात ‘Someone special’ची एन्ट्री; पोस्ट शेअर करत म्हणाली, ‘तयार व्हा’

बॉलिवूडची फॅशन डिवा म्हणून ओळखली जाणारी सोनम कपूर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सोनम तिच्या चाहत्यांसाठी बरेच सुंदर आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या फॅशन सेन्समुळे ती अनेकदा चर्चेत येत असते. इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केल्यापासून तिने अनेक प्रसंगी तिच्या आउटफिट्स आणि लूकने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.

आजकाल सोनम चित्रपटांपासून दूर सोशल मीडियावरच अधिक वेळ घालवते. नुकतेच लंडनहून भारतात परतलेल्या सोनमने एक आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिने सांगितले आहे की, तिच्या आयुष्यात कोणीतरी खास येणार आहे, ज्याबद्दल ती खूप उत्साहित आहे. ( sonam kapoor reveals someone special entering in her life says be ready)

सोनम कपूरने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री स्माईल करताना दिसत आहे. फोटो शेअर करत, सोनमने लिहिलंय की, “एक कोणीतरी खास आहे, जो माझ्या आयुष्यात आला आहे आणि ती एक सुंदर भावना आहे. मी त्याला तुमच्याशी ओळख करून देण्याची वाट पाहू शकत नाही. त्याला लवकरच भेटायला तयार व्हा.”

सोनमची ही पोस्ट आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. सोनमच्या आयुष्यात कोण प्रवेश करणार आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकाला उत्सुकता लागली आहे. काही युजर्स तिला हार्ट ईमोजी पोस्ट करून प्रेम देत आहेत, तर काही जण ती प्रेग्नंट आहे असा अंदाज लावत आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चार वर्षांची असताना दिव्या दत्ताने पाहिले होते ‘हे’ स्वप्न; ‘अशा’प्रकारे ‘शब्बो’ने मारली रुपेरी पडद्यावर एन्ट्री

-विजय देवरकोंडाने वाढदिवसानिमित्त आईला दिली ‘ही’ अनोखी भेट; पाहुन तुम्हीही व्हाल स्तब्ध

-ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार फेस्टिवल धमाका! ऑक्टोबरमध्ये भेटीला येतायेत ‘हे’ चित्रपट अन् वेब सीरिज

हे देखील वाचा