Thursday, December 26, 2024
[aioseo_breadcrumbs]

बॅकलेस चोळीत सपनाने पहिल्यांदाच दाखवला टॅटू, अफलातून ठुमक्यांनी माजवली खळबळ

सपना चौधरीच्या डान्सने लाखो लोकांना वेड लावले आहे. तिचा डान्स आणि सुंदर एक्सप्रेशन्स चाहत्यांना घायाळ करतात. ‘बिग बॉस’नंतर ती केवळ हरियाणवी इंडस्ट्रीतच नाही, तर भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधीलही एक प्रसिद्ध नाव बनली आहे. सपना सोशल मीडियावर सक्रिय असून कायम चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच सपनाचा ‘जिंद आला’ हे नवीन गाणं रिलीज झाले आहे, ज्यात सपना चाैधरी गाण्यावर ठेका घेताना दिसत आहे. 

सपना चाैधरी (Sapna Choudhary) हिचा हा नवीन व्हिडिओ साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल हाेत आहे. व्हिडिओमध्ये सपना चाैधरी दमदार अदा देताना दिसत आहे. सपनाचं हे गाणं इतर गाण्याप्रमाणे हिट झाले. या आनंदात तिने इंस्टाग्रामवर एक रील शेअर केला आहे, ज्यात तिने चाहत्यांना आपला टॅटू दाखवला आहे, जाे आतापर्यंत तिने लपवून ठेवला हाेता.

व्हिडिओमध्ये सपना चाैधरी दमदार डान्स करताना दिसत आहे, ज्यात तिने केस वर बांधल्याने तिचा गळ्यावरचा टॅटू दिसत आहे. तिच्या मानेवर क्वीन लिहिलेले दिसत आहे. तिचा टॅटू खूप स्टायलिश आणि शानदार दिसत आहे, ज्यावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची नजरा खिळल्या आहेत. व्हिडिओ शेअर करत सपनाने लिहिले की, “लो जी आग्या #jind_ aala
reels का जाेट्टा मारदयो…”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary)

सपना चौधरी सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, जेव्हाही तिचा नवीन व्हिडिओ समोर येतो, तेव्हा ती व्हिडिओ शेअर करायला विसरत नाही. सपनाच्या व्हिडिओवर चाहते सतत लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत. तिने तिच्या गाण्यांवर बनवलेले रील शेअर केले आणि चाहत्यांकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल आभार व्यक्त केले. व्हिडिओमध्ये सपना चौधरीला लेहंगा चोलीमध्ये पाहून चाहते खूप खुश झाले आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
फेक फोटोंमुळे चर्चेत आले होते ‘हे’ बॉलिवूड कलाकार, यादीमध्ये आहेत मोठ मोठे अभिनेते
चित्रपटापेक्षाही जास्त लोकप्रियता मिळवणाऱ्या ‘या’ पाच वेबसीरिज, पाहा यादी

हे देखील वाचा