Sunday, January 26, 2025
Home अन्य ‘गजबन’नंतर सपना चौधरीच्या ‘या’ गाण्याने लावले प्रेक्षकांना वेड; वारंवार पाहिला जातोय व्हिडिओ

‘गजबन’नंतर सपना चौधरीच्या ‘या’ गाण्याने लावले प्रेक्षकांना वेड; वारंवार पाहिला जातोय व्हिडिओ

हरियाणवी इंडस्ट्रीची लोकप्रिय डान्सर सपना चौधरीने हरियाणा सोबतच संपूर्ण भारतावर आपली जादू केली आहे. तिने आपल्या डान्सने आणि आपल्या अदाकारीने आपली ओळख निर्माण केली आहे. सपना चौधरीची गाणी सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा रंगवतात. सपना चौधरीची गाणी प्रदर्शित होताच मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. त्यामुळेच तिच्या सुपरहिट गाण्यांची खूप मोठी यादी आहे. रसिक तिचे व्हिडिओ मोठ्या आवडीने पाहतात. आता सपनाचे ‘घुंगरू टूट जायेगा’ हे गाणे जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओला यूट्यूबवर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत आणि हे व्ह्यूज वेगाने वाढतही आहेत.

गाण्याचा व्हिडिओ ५६ दशलक्षाहून अधिक म्हणजे तब्बल ५ कोटी ६० लाख वेळा पाहिला गेला आहे. या गाण्यात सपना चौधरीसोबत विवेक राघव देखील दिसत आहे. हे गाणं आमीन बरोडी यांनी लिहिले आहे. गाणे रिलीझ होऊन ५ महिने उलटले आहेत, पण तरीही प्रेक्षक तितक्याच आवडीने हे गाणे ऐकत आहेत. एवढेच नाही तर चाहते सोशल मीडियावर या गाण्यावर व्हिडिओ देखील बनवत आहेत. या गाण्यात सपनाच्या जबरदस्त डान्सशिवाय तिचा पारंपरिक अवतार ही पाहायला मिळणार आहे. (Actress Sapna Chowdhury hurts fans with her acting, video goes viral)

विशेष म्हणजे सपनाची अशी अनेक गाणी आहेत, जी अजूनही प्रेक्षकांना त्याच उत्साहात ऐकायला आवडतात. तर या यादीच्या अव्वल स्थानी ‘तेरी आंखा का यो काजल’ हे आहे. याशिवाय हिट गाण्यांच्या यादीत ‘गजबन पानी’, ‘चटक मटक’ यासह अनेक गाणी आहेत. त्याचबरोबर सपना चौधरी सध्या अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. अलीकडेच तिची काही गाणी प्रदर्शित झाली आहेत. ज्यात ‘फटफटिया’ आणि गुर्शल यांचा समावेश आहे. सपना चौधरीची आणखी बरीच गाणी येत्या काही दिवसात प्रदर्शित होणार आहेत. प्रदर्शित होणारी पुढील गाणी देखील अशी सुपरहिट होतील का है देखील पाहण्यासारखे आहे.ॉ

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी स्वत:ला स्टारकिड मानत नाही’; अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचे मोठे वक्तव्य

-‘इंडियन आयडल १२’च्या ग्रँड फिनालेने टेलिव्हिजन विश्वात नोंदवला ‘हा’ खास विक्रम; टीमने आनंद साजरा केला

-‘बिग बीं’च्या सुरक्षेत तैनात हेड कॉन्स्टेबलची झाली बदली; पगाराची माहिती मिळताच बॉडीगार्डविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा