साराच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग माहिती आहे का? मग अभिनेत्रीने शेअर केलेली ही पोस्ट एकदा पाहाच


बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार  आहेत, ज्यांनी आपल्या वडिलांच्या प्रसिद्धीचा कोणताही फायदा न घेता स्वत:च्या जीवावर चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. यामध्ये समावेश होतो अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान या अभिनेत्रीचा. साराने मोजक्याच चित्रपटात काम केले आहे, पण या चित्रपटांमध्ये साकारलेल्या अभिनयाने एक वेगळीच छाप सर्वांवर पाडली आहे. अभिनयाव्यतिरिक्त सारा सोशल मीडियावरही सक्रिय असते. ती आपले फोटो व्हिडिओ शेअर करत असते. आता तिने नुकतेच आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. (Actress Sara Ali Khan Was Seen Making Tea And Told The Fans The Easy Way To Reach Her Heart)

साराने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या वेगवेगळ्या फोटोंमध्ये सनसेट, बर्फाळ प्रदेश, ट्रेकिंग, बीच आणि चहा या सर्व गोष्टींचा आनंद लुटत आहे. याव्यतिरिक्त अभिनेत्रीने आपले मन जिंकण्याबाबतही सांगितले आहे. मात्र, ज्या गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधले आहे, ती म्हणजे चहा बनवताना तिचा एक बूमरँग व्हिडिओ. पांढरा सूट आणि मॅचिंग मास्कमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, कदाचित ती ‘अतरंगी रे’ या चित्रपटाच्या सेटवर एका चहाच्या दुकानावर फिरत होती.

अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, “साराच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग. माझ्या आवडीच्या भागाचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करा? लवकर सुरू करण्यासाठी द रायझिंग सन? किंवा असा चहा बनवावा जशी ही एक कला आहे?”

साराच्या या पोस्टनंतर लगेचच तिची आत्या म्हणजेच सबा अली खानने कमेंट करत लिहिले की, “मला विश्वास नव्हता की, तू चहा बनवू शकतेस. खूप प्रेम.”

साराच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती आनंद एल राय यांच्या ‘अतरंगी रे’ चित्रपटात अक्षय कुमार आणि धनुषसोबत दिसणार आहे. यामध्ये अभिनेता झीशान अय्यूबदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, साराला आदित्य धरच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या ‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’मध्ये विकी कौशलसह कास्ट करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी असे वृत्त होते की, कार्तिक आर्यन आणि सारा एका नवीन प्रोजेक्टसाठी एकत्र येऊ शकतात. दोघेही शेवटचे इम्तियाज अली यांच्या ‘लव्ह आज कल’मध्ये एकत्र दिसले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.