Tuesday, September 17, 2024
Home बॉलीवूड जेव्हा धर्मेंद्र यांना फसवून दिग्दर्शकाने बनवला ऍडल्ट सिनेमा; सनी देओलने थेट घरी बोलावून दिली होती धमकी

जेव्हा धर्मेंद्र यांना फसवून दिग्दर्शकाने बनवला ऍडल्ट सिनेमा; सनी देओलने थेट घरी बोलावून दिली होती धमकी

हिंदी चित्रपटसृष्टीत ‘ही मॅन’ नावाने ज्यांची ओळख आहे, ते म्हणजे बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र होय. त्यांनी 70- 80 च्या दशकात अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यामुळे बॉलिवूडमध्ये त्यांची ओळख ‘ऍक्शन हिरो’ या नावाने झाली. त्यांनी ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून त्यांच्या करिअरला सुरुवात केली होती. परंतु मीना कुमारीसोबत केलेल्या ‘फूल और पत्थर’ या चित्रपटातून त्यांना खरी ओळख मिळाली. 60 च्या दशकात करिअरला सुरुवात केलेले धर्मेंद्र 70 च्या दशकात येईपर्यंत एक सुपरस्टार झाले होते. परंतु अनेकांना ही गोष्ट माहीत नसेल की, त्यांनी त्यांच्या आयुष्यात एक अशी चूक केली होती, ज्याची त्यांना चांगलीच किंमत चुकती करावी लागली होती. ही गोष्ट त्यावेळीची आहे, जेव्हा ते बी-ग्रेड चित्रपटांचे बादशहा म्हणून ओळखले जाणारे कांती शाहसोबत एका चित्रपटात काम करत होते. चला तर जाणून घेऊया याबाबत एक रंजक किस्सा… (When dharmendra worked in adult film of kanti shah, sunny deol got angry)

कांती शाह यांनी या चित्रपटादरम्यान धर्मेंद्र यांच्यासोबत अशी चाल खेळली होती, ज्याने धर्मेंद्रसोबत त्यांचा मुलगा सनी देओल देखील हैराण झाला होता. आयएमडीबीच्या माहितीनुसार, कांती शाह यांनी धर्मेंद्र यांना धोका देऊन त्यांच्या ऍडल्ट चित्रपटात काम करायला लावले होते आणि धर्मेंद्र यांना या गोष्टीचा काहीच तपास नव्हता. धर्मेंद्र जेव्हा या चित्रपटाची शूटिंग करत होते, तेव्हा कांती यांनी धर्मेंद्र यांच्या छातीला तेल लावून त्यांना घोडेस्वारी करताना सीन शूट केला होता.

यानंतर कांती यांनी धर्मेंद्र यांची बॉडी डबल करून एक रेप सीन शूट केला होता. परंतु शेवटपर्यंत त्यांना या गोष्टीची भनक देखील लागली नाही की, कांती आपल्यासोबत हे सगळं करत आहेत. परंतु काही लोकांनी धर्मेंद्र यांचा मुलगा सनीला सांगितले की, त्याचे वडील ऍडल्ट चित्रपटात काम करत आहेत.

हे सगळं ऐकल्यावर सनी देओलला सुरुवातीला विश्वास नाही बसला. पण त्याने जेव्हा स्वतः डोळ्यांनी पाहिले, तेव्हा त्यांनी लगेच कांती शाह यांना कॉल केला आणि त्यांना घरी बोलावले. त्यानंतर सनी त्यांच्यावर खूप चिडला आणि त्यांना धमकी दिली.

सनी देओल कांती शाहला म्हणाला की, हा चित्रपट जर त्यांनी चित्रपटगृहामधून काढला नाही, तर ते कायद्याचा आधार घेतील. त्यानंतर ते खूप घाबरले आणि त्यांनी तो चित्रपट चित्रपटगृहामध्ये दाखवणे बंद केले.

हा चित्रपट आता कोठेही उपलब्ध नाहीये. यानंतर धर्मेंद्र यांनी ‘शोले’, ‘बगावत’, ‘प्रतिज्ञा’, ‘धरमवीर’, ‘चुपके चुपके’, ‘सीता और गीता’ या चित्रपटात काम केले.

हेही नक्की वाचा-
स्वत:च्या सिनेमाच्या प्रीमिअरला जाण्यापूर्वी भीतीने थरथर कापत होता सनी देओल, काय होतं कारण?
‘गदर’ चित्रपटासाठी मिळालेला पुरस्कार बाथरूममध्येच सोडून गेला होता सनी देओल; कारण वाचून व्हाल हैराण

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा