Sunday, May 19, 2024

सीमा सजदेह मद्यधुंद अवस्थेत पाेहचलेली घरी, तेव्हा काय हाेती मुलाची प्रतीक्रिया?

सोहेल खानची एक्स पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री सीमा सजदेह कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते. अनेकवेळा सीमा तिच्या बोल्ड लूकमुळे आणि फॅशनसेन्समुळे साेशल मीडियावर चर्चेत राहते. अशातच आता सीमा सजदेह मलायका अरोराचा शो ‘मुव्हिंग इन विथ मलायका‘मध्ये दिसली होती. या शोमध्ये तिने तिच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगितल्या, ज्यामध्ये गेल्याकाही दिवसात व्हायरल झालेल्या तिच्या व्हिडिओंचाही उल्लेख झाला.

काही काळापूर्वी सीमा सजदेह (seema sajdeh) हिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती मद्यधुंद अवस्थेत दिसली होती. व्हायरल व्हिडिओमध्ये सीमा मद्यधुंद अवस्थेत करण जोहरच्या घराबाहेर पॅपराझींना पोज देताना दिसली. ती दारूच्या नशेत इतकी होती की, पोज देताना ती अनेक वेळा दंगली, त्यामुळे तिला भिंतीचा आधार घ्यावा लागला. या व्हिडिओनंतर सीमाला खूप ट्रोल करण्यात आले. या व्हिडिओबद्दल सजदेहा मलायका अरोराच्या शाेबद्दल बाेलली.

‘मूव्हिंग इन विथ मलायका’ या शोदरम्यान होस्ट मलायकाने सीमाला याच व्हायरल व्हिडिओबाबत प्रश्न विचारला. मलायकाने सीमाला विचारले की, “नुकताच तुझा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला हाेता. मला कल्पना आहे की, तुझा मुलगा निर्वाण यानेही तो व्हिडिओ पाहिला असेल.” यावर सीमाने सांगितले की, “माझा व्हिडिओ पाहिल्यानंतर नीरवने मला फोन केला. ताे व्हिडिओबाबत काहीही बाेलला नाही, परंतु त्याने ड्रेसवर प्रश्न उपस्थित केले”. सीमाने सांगितले की, “त्या व्हिडिओमुळे ती पुढचे दोन दिवस खूप घाबरली होती.”

सीमा सजदेहची संवाद साधल्यानंतक मलायकाने तिच्यासाठी टाळ्या वाजवल्या आणि म्हणाली की, “तुम्ही चांगला टाइम स्पेंड केला, पण लोकांना या गोष्टी दिसत नाहीत.” ती म्हणाला असे का? “महिलांना बाहेर जाऊन दारू पिण्याची परवानगी नाही? महिलांना मजा करण्याची परवानगी नाही ?” यावर मलायकाने सीमाला सांगितले की, “तुमच्या त्या व्हिडिओवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या, पण मला एक कळत नाही की, प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला का जज केले जाते?”

सीमा सजदेह ही सोहेल खानची पहिली पत्नी होती. लग्नाच्या काही काळानंतर दोघांनीही एकमेकांना घटस्फोट दिला. सोहेल आणि सीमा यांना निर्वाण नावाचा मुलगा आहे. (actre`s`s seema sajdeh disclosed about drunk video in moving in malaika told son reaction read new`s)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जगभरात 8 हजार कोटी कमावणाऱ्या ‘अवतार 2’ने बॉलिवूडलाही नाही सोडलं, कमावला तब्बल ‘इतका’ पैसा

साऊथ सुपरस्टारचा सुरक्षा रक्षकांवरच आरोप; म्हणाला, ‘भाषेमुळे माझ्या आई-वडिलांना…’

हे देखील वाचा