अभिनय क्षेत्रामध्ये अनेक दिग्गज कलाकार होऊन गेले. अशात ७० ते ८० च्या दशकामध्ये चांगलेच गाजलेल्या अनेक कलाकारांनी ९० चे दशक देखील गाजवले आणि आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अनेक मोठमोठ्या पुरस्कारांवर स्वतःचे नाव कोरले. यातील एक दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी.(Shabana Azami) शबाना यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये भन्नाट अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. आजही त्यांचे चाहते त्यांनी अभिनय केलेले चित्रपट आवडीने पाहतात. शबाना शुक्रवारी (१८ सप्टेंबर) त्यांचा वाढदिवस साजरा करतात. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांचा अभिनय क्षेत्रातील जीवन प्रवास.
शबाना यांचा जन्म हैदराबादमध्ये १८ सप्टेंबर १९५० रोजी झाला. मुंबई मधील क्वीन मेरी स्कूल या शाळेमध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यांनतर त्यांनी सेंट जेवियर्स कॉलेजमधून मानसशात्राची पदवी संपादन केली. अभिनयातील आवड लक्षात घेत, त्यांनी अभिनय शिकण्यासाठी फिल्म ऍंड टेलीविजन इंस्टीट्यूट ऑफ इंडियामध्ये साल १९७३ मध्ये प्रवेश घेतला. जया बच्चन यांच्याकडून त्यांना अभिनयाची प्रेरणा मिळाली. त्यानंतर त्यांनी साल १९७४मध्ये चित्रपटसृष्टीमध्ये आपले पहिले पाऊल टाकले. सुप्रसिद्ध निर्माते श्याम बेनेगल यांचा चित्रपट ‘अंकुर’मध्ये शबाना यांनी पहिल्यांदा अभिनय केला. या चित्रपटामध्ये त्यांनी एका मोलकरणीची भूमिका साकारली. पहिल्याच चित्रपटामध्ये त्यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारावर झेप घेतली. शबाना यांनी ७० च्या दशकापासून ते ९० च्या दशकापर्यंत अनेक यशस्वी चित्रपट या सिनेसृष्टीला दिले आहेत. (Actress Shabana Azmi know resting things related to her life)
शबाना आझमी यांनी महेश भट्ट दिगदर्शित ‘अर्थ’ या चित्रपटामध्ये देखील अभिनय केला. त्यांच्या या चित्रपटामधील अभिनयाने देखील लाखो चाहत्यांची मने जिंकली. तसेच ‘खंडहर’ चित्रपटामध्ये देखील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. त्यावेळी हा चित्रपट कांस फिल्म फेस्टिवलमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. मृणाल सेन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
पुरस्कारांची यादी ऐकून व्हाल थक्क
दिग्गज अभिनेत्री या त्यांच्या अभिनयाला पूर्णपणे न्याय द्यायच्या. त्यामुळे त्यांचा प्रत्येक चित्रपट हा हिट होत गेला आणि त्यांच्या पारड्यातील पुरस्कार वाढत गेले. त्यांच्या अभिनयातील खरेपणाला प्रेक्षकांची देखील उत्तम दाद मिळत होती. त्यांच्या नावे पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहेत, तर पाच फिल्मफेयर पुरस्कार आहेत. त्यांना ‘पद्मश्री’ आणि ‘पद्मभूषण’ या पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले आहे. साल १९८८मध्ये त्यांना देशाचा चौथा सर्वोत्कृष्ट नागरिक म्हणून दिल्या जाणाऱ्या ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले गेले. तसेच साल २०१२मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्कारावर त्यांनी नाव कोरले होते. त्यांनी साल १९८३, १९८४ आणि १९८५ सलग तीन वर्षे पुरस्कार जिंकले आहेत. त्यांनी साल १९७७ मध्ये ‘स्वामी’, साल १९७९ मध्ये ‘जुनून’, साल १९८० मध्ये ‘स्पर्श’, साल १९८२ मध्ये ‘अर्थ’ असे अनेक हिट चित्रपट या सिनेसृष्टीला दिले.
फक्त ३० रुपयांसाठी करत होत्या ‘हे’ काम
शबाना यांच्या आईचे नाव शौकत आझमी आणि वडिलांचे नाव कैफी आझमी हे होते. त्यांचे वडील त्या काळातील प्रसिद्ध कवी होते. शौकत आझमी यांचे साल २०१९ मध्ये निधन झाले. शबाना यांच्या आईच्या ‘कैफी ऍंड आय मेमॉयर’ या आत्मकथेमधून अनेक गोष्टींचा खुलासा झाला. यामध्ये शबाना फक्त ३० रुपयांसाठी कॉफी विकायच्या असा उल्लेख आहे. त्यांनी ३ महिने पेट्रोल पंपावर रोज ३० रुपये मिळवण्यासाठी कॉफी विकली. परंतु त्या वेळी त्यांच्या आईला या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती. साल २००५ मध्ये त्यांनी ही आत्मकथा लिहिली.
घरच्यांच्या विरोधात जाऊन केला विवाह
शबाना यांनी साल १९८४ मध्ये जावेद अख्तर यांच्याशी विवाह केला. त्यावेळी जावेद अख्तर शबाना यांच्या वडिलांकडून लिखाण शिकत होते. त्यावेळी त्यांचे शबाना यांच्या घरी नेहमी येणे जाणे असायचे. याच दरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.
त्यांनी लग्न करायचे ठरवले परंतु जावेद अख्तर यांचे हनी यांच्याशी लग्न झाले होते. त्यामुळे शबानांच्या आई वडिलांनी या लग्नाला विरोध केला. परंतु हट्टी शबाना यांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन जावेद अख्तर यांच्याशी लग्नगाठ बांधली.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही नक्की वाचा-
ब्रेकिंग! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, खलनायक बनून मिळवलेली ओळख
पाच राष्ट्रीय पुरस्कार जिंकणाऱ्या शबाना आझमी नक्की शिकल्यात तरी किती? वाचा संपूर्ण माहिती
‘विक्रम वेधा’च्या नवीन गाण्याचा आख्ख्या मार्केटमध्ये राडा, ऋतिकचा टपोरी डान्स वेधतोय सर्वांचं लक्ष