Monday, October 14, 2024
Home बॉलीवूड अंबानींच्या घरी गणरायाचा जल्लोष; 68वर्षीय रेखाच्या लूकने चाहत्यांना घातली भूरळ

अंबानींच्या घरी गणरायाचा जल्लोष; 68वर्षीय रेखाच्या लूकने चाहत्यांना घातली भूरळ

दहा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. विविध संघटनांकडून होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तयारीला अंतिम स्वरूप देण्यात येत आहे. मुकेश अंबानींच्या घरी आयोजित केलेला प्रत्येक उत्सव वर्षातील सर्वात मोठा आकर्षण सण ठरतो. आता नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांचे गणेश चतुर्थी सेलिब्रेशन चर्चेत आहे, जो काल मुंबईतील त्यांच्या आलिशान बंगला अँटिलिया येथे साजरा करण्यात आला.

अंबानी कुटुंबाच्या गणपती (Ganeshotsava) पूजेला बॉलिवूडमधील जवळपास प्रत्येक प्रसिद्ध चेहऱ्याने हजेरी लावली. या फेस्टिव्हलच्या निमित्ताने त्यांनी अनेक पाहुण्यांनाही आमंत्रित केले होते, ज्यात सिनेतारकांपासून क्रिकेटपटू आणि मोठ्या उद्योगपतींपर्यंत सर्वांचा समावेश होता. संपूर्ण वातावरण पारंपारिक रंगात रंगलेलं दिसत होतं. काहींनी त्यांच्या जोडीदारासह तर काहींनी कुटुंबासह सेलिब्रेशनमध्ये भाग घेतला. यामध्ये बच्चन यांची सून ऐश्वर्या राय देखील मुलगी आराध्या बच्चनसोबत अंबानींच्या घरी पोहोचली. या सेलिब्रेशनमध्ये दोघांचीही एन्ट्री खास होती, कारण या आई-मुलीच्या जोडीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन गणेश चतुर्थीला आल्या होत्या. दोघांनी सुंदर पटियाला सूट घातले होते. ऐश्वर्या रायने निळ्या रंगाचा सूट घातलेला दिसला, तर आराध्या पिवळ्या रंगाच्या ड्रेस परिधान केलेला दिसला. पण बऱ्यापैकी दोघींचे ड्रेस सेम होत. त्या दोघिंनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. आराध्या हातात बॅग घेऊन दिसली. अंबानींच्या या पार्टीतील ऐश्वर्या राय आणि आराध्याचे फोटो सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत आहेत.

अंबानी कुटुंबाच्या गणेश चतुर्थी सोहळ्यात आणखी एक अभिनेत्री जी एक प्रमुख आकर्षण होती ती म्हणजे रेखा. अभिनेत्री पुन्हा एकदा तिच्या लोकप्रिय कांजीवरम साडीत दिसली. गोल्डन कलरच्या बॉर्डर असलेल्या अतिशय सुंदर लाल रंगाच्या साडीत रेखा अंबानींच्या घरी पोहोचली. सध्या रेखाचा हा लूक चांगलाच चर्चेत आला आहे.  (Aishwarya Rai Aaradhya Bachchan and 68-year-old Rekha look on the occasion of Ganeshotsava at Ambani’s house in discussion)

आधिक वाचा-
धक्कादायक! ‘इमली’ मालिकेच्या सेटवर विजेचा धक्का लागल्याने ‘या’ व्यक्तीचा मृत्यू
चप्पल घालून गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्यामुळे ट्रोल झाली फराह; नेटकरी म्हणाले, ‘चप्पल काढा नाहीतर…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा