Friday, March 29, 2024

Hijab Controversy | मालिकेच्या सेटवर हिजाब घालून आली ‘ही’ अभिनेत्री, मग पुढं जे झालं…

कर्नाटकमधील एका महाविद्यालयात सुरू झालेले हिजाब प्रकरण खूपच गाजले. या प्रकरणाने देशभर उग्ररूप धारण केले होते. सगळीकडे याच प्रकरणाची जोरदार चर्चा झालेली पाहायला मिळाली. या घटनेवर फक्त राजकीय मैदातूनच नव्हे, तर मनोरंजन क्षेत्रातूनही जोरदार टीका झाली होती. हिंदी चित्रपट क्षेत्रातील अनेक कलाकारांनी यावर आपले मत व्यक्त केले होते. आता या प्रकरणाची चर्चा छोट्या पडद्यावरही होताना दिसत आहे. दंगल चॅनेलवरील एका प्रसिद्ध कार्यक्रमातील प्रमुख अभिनेत्रीने हिजाब घालून सेटवर एंट्री केल्याने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ.

देशभरात गेले काही दिवस हिजाब प्रकरण प्रचंड गाजले. या प्रकरणाच्या विरोधात आणि समर्थनार्थ अनेकांनी भूमिका घेतल्या होत्या. आता हे प्रकरण शांत झाल्याचे वाटत असतानाच छोट्या पडद्यावर या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. दंगलवरील प्रसिद्ध मालिका ‘रक्षाबंधन- रसाल अपने भाई की ढाल’मध्ये अभिनेत्रीने हिजाब घालून सेटवर एंट्री केल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार या मालिकेत हिजाबवर काही भाग दाखविण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. यासोबतच मालिकेत नवीन अभिनेत्रीची एंट्रीसुद्धा होणार आहे. सध्या वादात आणि चर्चेत असलेल्या हिजाब प्रकरणाचा आपल्या मालिकेच्या टीआरपी साठी फायदा करून घेण्याचा यामागे हेतू असल्याचे समजले आहे. त्यामुळेच मालिकेच्या निर्मात्यांनी हा खटाटोप केल्याचे बोलले जात आहे.

‘रक्षाबंधन- रसाल अपने भाई की ढाल’ शूटिंगमध्ये शिवाची भूमिका साकारत असलेल्या निशांत मल्कानीने सांगितले की, आत्तापर्यंत रसाल आणि शिवा एकमेकांची ढाल बनून उभे राहिले आहेत. मात्र आता पुढे मालिकेत चांगलाच ट्विस्ट येणार असून गावावर हल्ला होणार आहे. त्यामुळे धमाकेदार प्रसंग पाहायला मिळणार आहे. यामध्ये सेटवर हिजाब घालून आलेल्या अभिनेत्रीचे नाव शीन दास असल्याची माहिती समोर आली आहे. शीनने याआधी ‘पिया अलबेला’, आणि ‘शादी के सियापे ‘या मालिकेत काम केले आहे. आता या मालिकेला हिजाब प्रकरणाने किती प्रसिद्धी मिळणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.

हेही वाचा – 

हे देखील वाचा