हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी दिशा पटानीपासून ते इलियाना डिक्रूजपर्यंत अनेक बोल्ड अभिनेत्रींचा समावेश आहे. या अभिनेत्रींपैकीच एक म्हणजे शेफाली जरीवाला होय. शेफाली अभिनयाव्यतिरिक्त सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. तिचे इंस्टाग्रामवर तब्बल १९ लाख फॉलोअर्स आहेत. यामुळे तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो. शेफाली जेव्हा घरी असते, तेव्हा ती आपल्या सुंदर आऊटफिटमध्ये इनडोर फोटोशूट करते. मात्र, जेव्हा ती फिरायला जाते, तेव्हा ती तेथील आपले फोटोही शेअर करते. यावेळीही तिने परदेशातील फोटो शेअर केला आहे, जो आता चांगलेच चर्चेत आहेत.
शेफालीच्या इटलीतील फोटोने इंटरनेटवर राडा केला आहे. या फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे. (Actress Shefali Jariwala Cute Look In Red Dress)
असा आहे ड्रेस
शेफालीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या या फोटोत लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हा एक सुंदर वनपीस आहे, ज्यात स्ट्रिप्स आहे. खालील भागात वेगवेेगळ्या लेअर्स आहेत. फिरण्यासाठी हा ड्रेस खूपच आरामदायी असल्याचे दिसते.
दिसतेय एकदम आनंदी
शेफाली इटलीतील या फोटोत एकदम आनंदी दिसत आहे. असे वाटत आहे की, ती कोणत्यातरी जुन्या घराच्या कट्ट्यावर बसून थोडी पुढे झुकत फोटोसाठी हटके पोझ देत आहे. शेफाली पाय क्रॉस करून बसली आहे आणि तिच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसत आहे.
केस सोडले मोकळे
शेफालीने स्ट्रेट आणि कलर केसांना मोकळे सोडले आहे. काही केस पुढे आले आहेत, जे खूपच चांगले दिसत आहेत. चेहऱ्यावर ड्रेसनुसार मेकअप करण्यात आला आहे. चेहऱ्यावर रूस आहे आणि ओठांवर हलकी लिपस्टिक दिसत आहे. आपल्या या लूकने तिने चाहत्यांना पुरते घायाळ केले आहे.
चाहत्यांकडून होतोय प्रेमाचा वर्षाव
शेफालीने हा फोटो शेअर करत “आनंद” असे लिहिले आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे. आतापर्यंत तिच्या या पोस्टला ३५ हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. याव्यतिरिक्त कमेंट करत चाहत्यांनी “सुंदर”, “आकर्षक”, “हॉट”, “सेक्सी”, “क्यूट”, “व्वा” यांसारख्या कमेंट केल्या आहेत.
https://www.instagram.com/p/CRWTNpLrgQc/?utm_source=ig_web_copy_link
तसं पाहिलं, तर ती फिरायला गेल्यावर परिधान केलेल्या वेगवेगळ्या आऊटफिटमधील आपले हटके फोटो शेअर करत असते. विशेष म्हणजे ती पती त्यागी सोबतही एकापेक्षा एक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
शेफालीची कारकीर्द
शेफालीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर तिने २००२ साली ‘काटा लगा’ या म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले होते. या एकाच गाण्याने तिला खूप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तिला सगळेजण ‘काटा लगा गर्ल’ या नावाने ओळखू लागले. तिने अनेक रियॅलिटी शो आणि अनेक कन्नड चित्रपटात देखील काम केले आहे. यानंतर ती ‘नच बलिये’ या शोमध्ये दिसली होती. तिने ‘बेबी कम ना’ या वेब सीरिजमध्ये श्रेयस तळपदेसोबत काम केले आहे. तसेच ती ‘बिग बॉस १३’ ची स्पर्धक देखील आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-स्विमिंग पूलच्या कडेला मोनालिसाने दिल्या घायाळ करणाऱ्या पोझ; पाहून वाढतील तुमच्याही हृदयाचे ठोके
-शुभमंगल सावधान!!! राहुल वैद्य आणि दिशा परमार अडकले विवाहबंधनात; लग्नसोहळ्याचे खास फोटो आले समोर