स्विमिंग पूलच्या कडेला मोनालिसाने दिल्या घायाळ करणाऱ्या पोझ; पाहून वाढतील तुमच्याही हृदयाचे ठोके


भोजपुरी चित्रपटसृष्टीमध्ये जेव्हा जेव्हा सुंदर अभिनेत्रींचा उल्लेख होतो, तेव्हा अभिनेत्री मोनालीचे नाव सगळ्यात टॉपला असते. मोनालिसा भोजपुरी चित्रपट सृष्टीमधील सगळ्यात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. ती तिचे अनेक वेगवेगळे फोटो शेअर करून तिच्या सौंदर्याचे दर्शन प्रेक्षकांना देत असते. अनेक भोजपुरी चित्रपटात काम केल्यानंतर मोनालिसा आता टेलिव्हिजनवर काम करू लागली आहे. तिने टेलिव्हिजन दुनियेत देखील वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या अभिनयाचे सगळे दीवाने आहेत. पण त्यासोबत ती चर्चेत असते, ते म्हणजे तिच्या सोशल मीडिया पोस्ट वरून. मोनालिसाचा सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोवर्स आहेत. तिला इंस्टाग्रामवर तब्बल ४.५ मिलियन फॉलोवर्स आहेत. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. 

मोनालिसाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत. हा फोटोमध्ये ती स्विमिंग पूलजवळ चाहत्यांना घायाळ करणाऱ्या पोझ देताना दिसत आहे. या फोटोमध्ये तिने आकाशी रंगाचा ड्रेस घातला आहे. ती या ड्रेसमध्ये वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. (Bhojpuri actress Monalisa’s bold photo viral on social media)

तिचे चाहते देखील लाईक्स आणि कमेंटच्या माध्यमातून तिच्या या फोटोला प्रतिसाद देताना दिसत आहेत. तिच्या या फोटोंना ६० हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. तिचा हा कूल लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

मोनालिसा ही ‘बिग बॉस १०’ ची स्पर्धक होती, तेव्हा तिने तिच्या बॉयफ्रेंड विक्रांत सिंग राजपूत याच्याशी २०१७ मध्ये बिग बॉसमध्येच लग्न केले होते. त्यावेळी देखील ती खूपच चर्चेत होती. तिने ‘ब्लॅकमेल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तिने ‘नझर’ आणि ‘नझर 2’ या मालिकांमध्ये देखील काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आदिल खानसोबत जोरदार ठुमके लावताना दिसली शिल्पा शेट्टी; ‘चुरा के दिल मेरा’ गाण्यावरचा धमाल परफोर्मेंस होतोय व्हायरल

-खरी-खुऱ्या आयुष्यातली ‘बार्बीडॉल’ आहे कॅटरिना कैफ; वाचा तिच्याबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी

-निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ‘डिज्नी प्रिंसेस’ दिसतेय रुबीना दिलैक; पाहा अभिनेत्रीच्या मनमोहक अदा


Leave A Reply

Your email address will not be published.