शुभमंगल सावधान!!! राहुल वैद्य आणि दिशा परमार अडकले विवाहबंधनात; लग्नसोहळ्याचे खास फोटो आले समोर


मागील अनेक दिवसांपासून टेलिव्हिजन दुनियेतील प्रत्येकाच्या ओठावर एकच गोष्ट होती. ती म्हणजे राहुल वैद्य आणि दिशा परमारचे लग्न. अखेर त्यांच्या चाहत्यांची प्रतीक्षा आज संपली आहे. आजच्या सुवर्ण मुहूर्तावर राहुल आणि दिशा रेशीमगाठीत अडकले आहेत. शुक्रवारी (१६जुलै) राहुल आणि दिशाचा लग्न सोहळा मुंबईमध्ये पार पडला आहे. त्यांच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Rahul vaidya and disha Parmar’s wedding photos viral on social media)

दिशा आणि राहुलचे लग्नातील काही फोटो समोर आले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, दिशा नवरीच्या वेशात अत्यंत सुंदर आणि सालस दिसत आहे. तिने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. तसेच सगळा साज-शृंगार केला आहे. डोक्यावर दुपट्टा घेतला आहे. तसेच राहुलने देखील क्रीम कलरची शेरवानी घातली आहे. तसेच डोक्यावर फेटा घातला आहे. तो देखील नवरदेवाच्या रुपात अगदी शोभून दिसत आहे. ते दोघे खूप खुश दिसत आहे. लग्नाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

काही आठवड्यापूर्वी राहुल आणि दिशाने सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी त्यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यांनी त्यांचे मेहेंदी फंक्शन, हळदी फंक्शन हे सगळे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांसाठी शेअर केले होते.

 

राहुल आणि दिशाची लव्ह स्टोरी २०१८ मध्ये सुरू झाली होती. त्या दोघांनी सर्वात आधी इंस्टाग्रामवर चॅटिंग केली. त्यानंतर ते दोघे खूप चांगले मित्र झाले. बिग बॉसच्या घरात असताना राहुलने सर्वांसमोर तिला प्रपोज केले होते. त्याचा तिने तिथे स्वीकार देखील केला होता. ते दोघे या वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात लग्न करणार होते, पण कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे त्यांना तारीख पुढे ढकलावी लागली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ‘डिज्नी प्रिंसेस’ दिसतेय रुबीना दिलैक; पाहा अभिनेत्रीच्या मनमोहक अदा

-‘सच कहूं तो’मध्ये नीना गुप्ता यांनी केला त्यांच्या पहिल्या लग्नाबाबत खुलासा; म्हणाल्या, ‘तो अनुभव खूपच…’

-खरी-खुऱ्या आयुष्यातली ‘बार्बीडॉल’ आहे कॅटरिना कैफ; वाचा तिच्याबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी


Leave A Reply

Your email address will not be published.