Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड सलमानला किस केल्यामुळे ट्रोल झाली होती शहनाझ, पहिल्यांदाच मौन सोडत म्हणाली, ‘मी तर फक्त…’

सलमानला किस केल्यामुळे ट्रोल झाली होती शहनाझ, पहिल्यांदाच मौन सोडत म्हणाली, ‘मी तर फक्त…’

कलाकार मोठ्या पडद्यावरील असो किंवा छोट्या पडद्यावरील, तो त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. अशीच एक अभिनेत्री आहे, जिच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा चांगलीच रंगलेली असते. ती अभिनेत्री इतर कोणी नाही, तर ‘बिग बॉस १३’मधील माजी स्पर्धक शहनाझ गिल ही आहे. मागील काही दिवसांपूर्वी तिला सलमानमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. अशात आता तिने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

खरं तर शहनाझ गिल (Shehnaaz Gill) ही त्यावेळी सलमान खान (Salman Khan) याची बहीण अर्पिता हिच्या ईद पार्टीमध्ये पोहोचली होती. त्या पार्टीतून बाहेर येताना तिने सलमानची गळाभेट घेतली आणि त्याला किसदेखील (Shehnaaz Gill Kiss Salman Khan) केले होते. यानंतर तिला ट्रोलर्सच्या रोषाचा सामना करावा लागला होता. आता तिने ट्रोल करणाऱ्यांवर आपले मत मांडले आहे.

तिने नुकत्याच एका वेबसाईटला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत सलमान खानला किस करण्याबाबत प्रतिक्रिया देताना ती म्हणाली की, “सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याचा अर्थ तुम्हाला खूप जास्त प्रेम मिळेल. मात्र, यासोबतच खूप जास्त ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. हे एक सत्य आहे आणि याचा सामना प्रत्येक कलाकार करत आहे. प्रत्येक गोष्टीच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजू असतात. आता हे तुमच्यावर आहे की, तुम्ही कशावर जास्त लक्ष देता.”

पुढे बोलताना शहनाझ म्हणाली की, “मला फक्त सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करायचे आहे. लोक मला किती प्रेम देतात. इतर सर्व नकारात्मकतेवर पडदा टाकण्यासाठी ते पुरेसे आहे, मग मी नकारात्मक बाजू का पाहावी? बरं, सोशल मीडिया हे असं माध्यम, पण आपण त्याच्या चांगल्या बाजूवर लक्ष केंद्रित करू शकतो.” याव्यतिरिक्त तिने अनेक गोष्टींबद्दल चर्चा केली.

शहनाझ गिलबाबत बोलायचं झालं, तर ती लवकरच सुपरस्टार सलमान खान याच्यासोबत बॉलिवूड पदार्पण करणार आहे. ती सलमानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमासाठी तिच्या चाहत्यांच्या आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा