Saturday, April 20, 2024

सिद्धार्थला आठवणींमधून दूर जाऊ देत नाहीये शहनाज, ऑटोग्राफ देताना लिहिलं ‘असं’ काही

रियॅलिटी शो ‘बिग बॉस’ फेम शहनाज गिलची (Shehnaaz Gill) लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. शहनाज आणि सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) यांची जोडी चाहत्यांना खूप आवडते आणि त्यांना सिडनाज म्हणून संबोधले जाते. अशातच आता शहनाजचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून चाहते सिद्धार्थ शुक्लाची आठवण करून भावूक झाले आहेत.

खरं तर शहनाज गिलने तिच्या एका चाहत्याला ऑटोग्राफ दिला होता, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऑटोग्राफ देताना शहनाज आधी सिड आणि नंतर नाज लिहित असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. शहनाजने लिहिले आहे की, ‘शहनाज तुमच्यावर प्रेम करते, नेहमी सपोर्ट करत राहा, सिडनाज!’ शहनाजची ही स्टाईल चाहत्यांना आवडली असून, ते तिची खूप प्रशंसा करत आहेत. (shehnaaz gill write sidharth shukla name first while signing an autograph)

एका युजरने लिहिले की, “ऑटोग्राफ देताना शहनाजने ज्या प्रकारे सिडनाज एकत्र लिहिण्याऐवजी सिडचे नाव वर आणि नाज खाली लिहिले, मला वाटते शहनाजने सिद्धार्थला एक दर्जा वर ठेवले आहे, जसे गार्जियन एंजेल पाहत आहे.” त्याच वेळी, दुसऱ्याने लिहिले की, “ते दोघे कधीही वेगळे होणार नाहीत, ती सिडला तिच्या डोक्याचा मुकुट म्हणून ठेवेल.”

काही दिवसांपूर्वी शहनाज गिलने अहमदाबादमध्ये रॅम्प वॉक केला होता. यादरम्यान शहनाजने रेड कलरच्या लेहेंग्यात नववधूसारखा पेहराव केला होता. शहनाजची स्टाइल आणि तिचा रॅम्पवरील लूक सर्वांनाच आवडला. त्याचवेळी शहनाजने सिद्धू मूसेवालाच्या (Sidhu Moosewala) गाण्यावर डान्सही केला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा