Monday, May 27, 2024

मुन्नाभाईच्या टीमसोबत शहनाज गिल करणार धमाल, सोशल मीडिया पोस्ट आली चर्चेत

‘बिग बॉस १३’ (Big Boss 13) फेम शहनाज गिल (Shehnaaz Gill) आता सर्वांची आवडती बनली आहे. पंजाबची कॅटरिना कैफ (Katrina Kaif of Punjab) म्हणून ओळखली जाणारी शहनाज आता बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. एवढेच नाही तर आता ती बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत मोठ्या कॉन्सर्टमध्येही सहभागी होत आहे. लवकरच शहनाज गिल बॉलीवूडच्या मुन्ना भाई म्हणजेच संजय दत्त आणि सर्किट उर्फ ​​अर्शद वारसीसोबत वर्ल्ड टूर करणार आहे.

संजय दत्त (Sanjay Dutt) आणि अर्शद वारसी (Arshad Warsi) यांचे ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ (Munna Bhai M.B.B.S.) आणि ‘लगे रहो मुन्ना भाई’ (Lage Raho Munna Bhai) हे सिनेमे सुपरहिट ठरले आहेत हे तुम्हाला माहीत आहेच. या चित्रपटांमध्ये संजय आणि अर्शद या मजेदार जोडीचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. त्यांच्या जोडीला पुन्हा एकत्र पाहण्यासाठी अनेक वर्षांपासून चाहते उत्सुक होते. आता शेवटी त्यांचा कॉन्सर्ट येणार आहे, ज्यामध्ये मुन्ना भाई आणि सर्किटची जोडी चाहत्यांच्या मनावर जादू निर्माण करेल. पण यावेळी ती जबरदस्त हिट ठरणार आहे, कारण यावेळी दोन नाही तर तीन जण पाहायला मिळणार आहेत. आणि मुन्ना भाई आणि अर्शदसोबत शहनाज गिल (Shehnaaz Gill) देखील दिसणार आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

 

शहनाज गिलने इंस्टाग्राम अकाउंटवर एक प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती संजय दत्त आणि अर्शदसोबत दिसत आहे. व्हिडिओमध्ये संजय आणि अर्शद म्हणतात की यावेळी शहनाज गिल देखील त्यांच्यासोबत असेल. तिघेही ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये खूप छान दिसत आहेत. व्हिडिओसोबत शहनाजने “मी तर चालले संजू बाबासोबत अमेरिका आणि कॅनडा. खूप मजा! पुढील महिन्यापासून सुरू होईल दौरा.” असा कॅप्शन देत या दौऱ्याबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. त्यामुळे आता मुन्नाभाईच्या टीमसोबत शहनाज धमाल करणार असल्याचे निश्चित झाले आहे.

हेही वाचा –

जान्हवी कपूरच्या लग्नाची सुरू झाली तयारी, पण बोनी कपूर यांनी ठेवली ‘ही’ विचित्र अट

तुला पाहून याडं लागलं..! सायली संजीवचा रोमॅंटिक व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल

रणवीरला ट्रोल करणाऱ्यांवर भडकल्या महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती; म्हणाल्या, ‘महिला जेव्हा नग्न होतात…’

 

हे देखील वाचा