Sunday, May 19, 2024

जान्हवी कपूरच्या लग्नाची सुरू झाली तयारी, पण बोनी कपूर यांनी ठेवली ‘ही’ विचित्र अट

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) आणि दिग्दर्शक बोनी कपूर (Boney Kapoor) यांची लाडकी मुलगी जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या तिच्या ‘गुड लक जेरी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील अभिनेत्रीचे अनेक लूक्स व्हायरल झाले आहेत, ज्यांना खूप पसंत केले जात आहे. चाहतेही हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या चित्रपटात जान्हवी एका बिहारी मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. जान्हवीचा हा चित्रपट मोठ्या पडद्यावर नाही तर ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. त्यााआधी जान्हवीने तिच्या लग्नाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे, ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

जान्हवी कपूर ही हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि बोल्डनेसने तिने अल्पावधीतच सिने जगतात प्रसिद्धी मिळवली आहे. सध्या अभिनेत्री गुड लक जेरी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी जान्हवी कपूरला (Janhvi Kapoor) तिच्या लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला, यावर जान्हवीने दिलेले उत्तर ऐकून सगळेच थक्क झाले. जान्हवी कपूरने सांगितले की, ‘तिला तिच्या वडिलांच्या मर्जीने लग्न करायचे आहे’. यासोबतच तिच्या वडिलांना तिच्यासाठी कोणता वर हवा आहे? याबद्दलही जान्हवीने खुलासा केला आहे.

जान्हवी कपूरने सांगितले की, “तिचे वडील बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी तिच्या भावी पतीबद्दल अनेक अपेक्षा ठेवल्या आहेत. याचा खुलासा करताना जान्हवी कपूर म्हणाली की, ‘आम्ही लहान होतो तेव्हा वडील मला जास्त आनंदाने सांगायचे की, तुझे लग्न झाल्यावर तू तुझ्या नवऱ्याला सांग की माझ्या वडिलांनी मला सर्वत्र फिरवले आहे.”

जान्हवी कपूर पुढे सांगते की, “ते असे म्हणाले कारण ज्याच्याशी मी किंवा खुशी लग्न केरेल त्याने आम्हाला आमच्या वडिलांनी जसं ठेवलं आहे तसंच ठेवलं पाहिजे’. जान्हवी कपूरचे हे बोलणे ऐकून तेथे उपस्थित असलेले सर्वजण खूप हसायला लागले.” जान्हवी कपूर ही इंडस्ट्रीतील गोंडस अभिनेत्रींपैकी एक आहे, जिची फॅन फॉलोइंग करोडोंच्या घरात आहे. तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी चाहते वेडे असतात.

दुसरीकडे, जान्हवीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिचा ‘गुड लक जेरी’ हा चित्रपट उद्या म्हणजेच (२९ जुलै) रोजी ओटीटी (OTT) वर प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती ‘रणभूमी’, ‘तख्त’, ‘मिस्टर अँड मिसेस माही’ आणि ‘बावल’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. यासोबतच तिचे चाहतेही तिच्या आगामी चित्रपटांबद्दल खूप उत्सुक आहेत.

हेही वाचा –

तुला पाहून याडं लागलं..! सायली संजीवचा रोमॅंटिक व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल

‘द्वेषाचा सामना करावा लागतोय’, ‘शमशेरा’ फ्लॉप झाल्याने व्यथित झाला अभिनेता संजय दत्त

Raksha Bandhan | चित्रपटाचे टायटल सॉन्ग ‘धागों से बांधा’ रिलीझ, ऐकल्यानंतर चाहत्यांना आठवले ‘तेरे नाम’

 

हे देखील वाचा