Monday, July 8, 2024

फक्त ‘या’ कारणासाठी शर्लिनसोबत नात्यात होता राजकारण्याचा मुलगा, भेटवस्तू देऊन अभिनेत्रीशी…

बॉलिवूडमध्ये बोल्ड आणि हॉट अभिनेत्रींचा भरणा आहे. यामध्ये आपली जागा बनवणारी अभिनेत्री म्हणजे शर्लिन चोप्रा होय. शर्लिन सिनेमातील तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. याव्यतिरिक्त ती वैयक्तिक आयुष्यातही तितकीच बोल्ड आणि हॉट आहे. ती आता लवकरच एका वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. या वेबसीरिजच्या प्रमोशनमध्ये ती व्यस्त असून यादरम्यान तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी खळबळजनक खुलासे केले आहेत. यावेळी तिने एका राजकारण्याच्या मुलासोबतच्या आपल्या रिलेशनशिपचाही खुलासा केला.

शर्लिन चोप्रा रिलेशनशिप
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) हिने तिच्या लव्ह लाईफविषयी धक्कादायक खुलासे केले. मुलाखतीत तिने मान्य केले की, तिचे एका राजकारण्याच्या मुलाशी अफेअर (An affair with a politician’s son) होते. अभिनेत्रीने सांगितले की, जेव्हा ते डेट करत होते, तेव्हा तिला कसे वाटले होते.

मुलाखतीत शर्लिनला तिच्या मागील वक्तव्याविषयी विचारण्यात आले होते. यावेळी तिने म्हटले होते की, “मी भूतकाळात पैशांसाठी अनेक लोकांसोबत झोपले होते.” यावर अभिनेत्री व्यक्त झाली. ती म्हणाली, “तुम्हाला निराश करण्यासाठी माफी मागते. मात्र, मी आता पैसे देवून रिलेशनशिप करण्यासाठी उपलब्ध नाहीये.”

शारीरिक संबंध ठेवू इच्छित होता राजकारण्याचा मुलगा
यानंतर तिने खिलासा केला की, तिचा एक बॉयफ्रेंड होता, जो एका मोठ्या राजकारण्याचा मुलगा होता. त्याने ज्याप्रकारे तिच्याशी वागला, त्यावरून असे वाटले की, तो जे काही तिच्यासाठी करत होता, ते फक्त शारीरिक रिलेशनशिपसाठी होते. ती म्हणाली की, तिचे मागील विधान खतपाणी घालून मोठे करण्यात आले आणि संदर्भातून बाहेर केले. ती असेही म्हणाली की, तिचा एक्स बॉयफ्रेंड अजूनही तिच्या होमटाऊनमध्ये राहतो आणि तोही त्याच्या वडिलांप्रमाणे एक राजकारणी बनला आहे.

यानंतर शर्लिनने असेही सांगितले की, ती जेव्हाही प्रेमाबाबत विचार करते, तेव्हा तिला एक्स बॉयफ्रेंडसोबत घालवलेल्या दिवसांची आठवण येते. तिला जाणवले की, तो तिला फक्त यासाठी भेटवस्तू द्यायचा, कारण त्याला तिच्यासोबत शारीरिक नाते ठेवायचे होते.

शर्लिन जल्द ही वेब सीरीज ‘पौरशपुर 2’ में नजर आएंगी. ये सीरीज ओटीटी प्लेटफार्म पर रिलीज़ होगी. इस वेब शो में शर्लिन ‘रानी स्नेहलता’ का किरदार में दिखेंगी.

 

View this post on Instagram

 

A post shared by ALTT (@altt.in)

शर्लिनचे सिनेमे
शर्लिन चोप्रा हिच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं, तर तिने आतापर्यंत जवळपास 20 सिनेमांमध्ये काम केले आहे. त्यापैकी ‘वजह तुम हो’, ‘गेम’, ‘जवानी दिवानी’, ‘दिल बोले हडिप्पा’, ‘रेड स्वास्तिक’, ‘माया’ यांसारख्या सिनेमांसाठी तिला ओळखले जाते. आता शर्लिन लवकरच ‘पौरशपूर 2’ या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. यामध्ये ती ‘राणी स्नेहलता’ ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. ही वेबसीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल. (actress sherlyn chopra revealed she was in relationship with a politician son in past know here)

महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! शरीराचा ‘हा’ पार्ट मोठा करण्यासाठी उर्फीने ओलांडलेल्या सर्व मर्यादा, फोटो पाहून चक्रावून जाल
बिग ब्रेकिंग! मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्याआड

हे देखील वाचा