Thursday, June 13, 2024

धक्कादायक! शरीराचा ‘हा’ पार्ट मोठा करण्यासाठी उर्फीने ओलांडलेल्या सर्व मर्यादा, फोटो पाहून चक्रावून जाल

प्रसिद्धी पिपासू कलाकारांमध्ये मॉडेल आणि ‘बिग बॉस ओटीटी’ची माजी स्पर्धक उर्फी जावेद हिच्या नावाचाही समावेश होतो. चाहत्यांचे लक्ष वेधण्यासाठी उर्फी तिच्या कपड्यांवर वेगवेगळे प्रयोग करत असते. उर्फीची चर्चा होणार नाही, असा एकही दिवस जात नाही. सोशल मीडियावर उर्फीचा चांगलाच वावर आहे. ती नेहमी फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत चर्चेत येते. आता उर्फी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी तिच्या चर्चेत येण्यामागील कारण जरा वेगळे आहे.

उर्फी जावेद (Urfi Javed) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये उर्फीने ओठांची सर्जरी केल्यानंतरचे फोटो शेअर केले आहेत. तसेच, तिने सांगितले आहे की, तिला यामुळे कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. या फोटोत उर्फीचे ओठ सुजलेले आणि विचित्र दिसत आहेत. या फोटोंवरून दिसते की, उर्फी खूपच चिंतेत आहे.

उर्फीची धक्कादायक पोस्ट
उर्फीने तिच्या इंस्टाग्रामवर विना मेकअप सुजलेल्या ओठांसोबत फोटो शेअर केले आहेत. या फोटोत उर्फीचे ओठ सुजले आहेत आणि चेहऱ्यावर खूपच वेदना दिसत आहेत. हे फोटो शेअर करत उर्फीने लिहिले की, “तुम्हा सर्वांसोबत माझा लिप फिलर प्रवास शेअर करत आहे. मी 18 वर्षांच्या वयात ओठांची सर्जरी केली होती. माझ्याकडे त्यावेळी फार पैसे नव्हते आणि मला माझे ओठ बिल्कुल आवडत नव्हते. कारण, ते खूपच बारीक होते. मला मोठे ओठ हवे होते. मी एका डॉक्टरांकडे गेले, ज्यांनी कमी पैशांमध्ये माझी लिप फिलर सर्जरी केली. हे खूपच वेदनादायक होते. मला हे विसरायचे आहे.” उर्फीने पुढे लिहिले की, “मी तुम्हा लोकांना हे म्हणत नाहीये की, तुम्ही असे करू नका. नक्कीच करा. मात्र, डॉक्टर चांगले असतील, याची काळजी घ्या.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi Javed (@urf7i)

नेटकऱ्यांचा सल्ला
उर्फीची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिच्या या पोस्टवर नेटकरी जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिले की, “तू नेहमीपासूनच सुंदर आहेस.” तसेच, आणखी एकाने प्रश्न विचारत म्हटले की, “हे सर्व करायची गरजच काय आहे. जशी आहेस त्यात आनंदी राहा.”

व्हिडिओ व्हायरल
यापूर्वी उर्फी जावेद हिचा एक रिसॉर्टवरील व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडिओत अभिनेत्री उर्फी जावेद हिने अक्षरांनी बनलेल्या कपड्यांनी तिच्या शरीराचा पुढील भाग झाकला होता. या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले होते. (Uorfi Javed wanted this body part in big size but destroyed urfi private part read here now)

महत्त्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्याआड
बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्मात्याच्या मुलीचे वयाच्या केवळ ४८ व्या वर्षी दुःखद निधन

हे देखील वाचा