कॅन्सरशी दीर्घकाळ लढा दिल्यानंतर किरण खेर अखेर परतल्या आहेत. किरण आता ‘इंडियाज गॉट टॅलेंट’च्या नवीन पर्वाचे परीक्षण करताना दिसणार आहेत. ६९ वर्षीय किरण यांनी ‘इंडियाज गॉट टॅलेंट’चे शूटिंग सुरू केले आहे. किरण, शिल्पा शेट्टी आणि बादशाह यांच्यासोबत पहिल्यांदाच या शोचे परीक्षण केले जात आहे. या शोचा एक बीटीएस व्हिडिओ शिल्पाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या व्हिडिओ क्लिपमध्ये शिल्पाने किरण यांच्या गळ्यातल्या हारावर कॅमेरा झूम केला आहे. व्हिडिओमध्ये शिल्पा म्हणताना ऐकू येत आहे की, “मी शूटिंगला फक्त दागिने पाहण्यासाठी येते.”
या व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टी म्हणताना दिसते की, “मी तर म्हणत आहे की, मला तुमचे करून घ्या. सिकंदर कुठं दागिने घालणार आहे.” यानंतर शिल्पा हसायला लागते. व्हिडिओमध्ये शिल्पा किरण यांच्याशी स्वतःला दत्तक घेण्याबद्दल बोलत आहे.
व्हिडिओमध्ये शिल्पा बादशाह आणि किरण यांच्यासोबत मस्ती करताना दिसत आहेत. किरण शिल्पाचे म्हणणे ऐकतात आणि म्हणतात की, “जर सिकंदरला घालायचे असेल, तर कदाचित तो दागिने घालेल.” किरण पुढे म्हणतात की, “मला वाटते की, माझे काही दागिने विकावेत, कारण सिकंदरचे लग्न होत नाही…तो म्हणाला असे करू नकोस माझी बायको घालेल.”
शिल्पा शेट्टी पुढे गंमतीने म्हणते, “सिकू, मी दागिने घेत आहे.” यानंतर ती कॅमेरा बादशाहकडे वळवते आणि म्हणते, “तुला काही बोलायचे आहे का?” यानंतर बादशाह दिवंगत अभिनेते अमरीश पुरी यांची नक्कल करतो.
विशेष म्हणजे कॅन्सरच्या आजारावर मात करून किरण खेर पुन्हा एकदा ‘इंडियाज गॉट टॅलेंट’द्वारे छोट्या पडद्यावर परतल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी किरण खेर यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते, त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. या रियॅलिटी शोबद्दल किरण खेर म्हणतात की, हा शो नेहमीच त्यांच्या हृदयाच्या जवळ आहे’ या रियॅलिटी शोसोबतचे त्यांचे हे नववे वर्ष आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-लंडनमध्ये भर रस्त्यात टायगर श्रॉफ दिसला ‘या’ व्यक्तीबरोबर फ्लर्ट करताना, व्हिडिओ झालाय व्हायरल
-आहा कडकच ना! नववधूच्या अवतारात दिसली अभिनेत्री आम्रपाली दुबे, स्टेजवर केला नवरदेवासोबत रोमान्स
-वाघीण आली परत, सुष्मिता सेनच्या बहुप्रतीक्षित ‘आर्या २’ वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित










