Friday, April 19, 2024

लंडनमध्ये भर रस्त्यात टायगर श्रॉफ दिसला ‘या’ व्यक्तीबरोबर फ्लर्ट करताना, व्हिडिओ झालाय व्हायरल

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ लवकरच ‘गणपत’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची शूटिंग सध्या यूकेमध्ये चालू आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत क्रिती सेनन असणार आहे. चित्रपटासोबतच टायगर त्याची ऍक्शन, बॉडी एब्स आणि डान्समुळे सर्वत्र चर्चेत असतो. त्याची बॉडी आणि स्टंट पाहून त्याचे चाहते नेहमीच त्याचे कौतुक करत असतात. अशातच त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो लंडनमधील रस्त्यावर मॅनेजरसोबत फ्लर्ट करताना दिसत आहे.

टायगर श्रॉफ हा दररोज सोशल मीडियावर त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. त्याचे चाहते देखील त्याच्या प्रत्येक पोस्टला भरभरून प्रतिसाद देत असतात. नुकतेच लंडनमधील एक व्हिडिओ त्याने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत मॅनेजर दिसत आहे. जी त्याच्यासोबत डान्स करत आहे. (Tiger Shroff flirts with his manager on road in London video viral)

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, टायगर ऍब्स दाखवून रस्त्यावर त्याच्या मॅनेजरसोबत फ्लर्ट करत आहे. हा व्हिडिओ शेअर करून त्याने लिहिले आहे की, “काही शब्द जे मला नेहमीच माझ्या मॅनेजरला सांगायचे होते परंतु ईशा गोरक्षा तू खूपच हॉट आहेस.” त्याने हॉट असा शब्दप्रयोग नाही केला परंतु तिथे फायर ईमोजी पोस्ट केली आहे.

टायगरची ही स्टाईल त्याच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. त्याचे चाहते सोशल मीडियावर सातत्याने या फोटोवर कमेंट करत आहेत. विकास बहल यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘गणपत’ या चित्रपटाची एका झलकवरून समजले होते की, चित्रपटात ऍक्शन असणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी क्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्याची योजना आहे.

यातील खास गोष्ट म्हणजे चित्रपटात अमिताभ बच्चन देखील असणार आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन हे टायगर श्रॉफच्या वडिलांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. परंतु अमिताभ बच्चन यांनी अजूनही कोणती अधिकृत घोषणा केली नाही. यासोबतच टायगर ‘हिरोपंती २’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत तारा सुतारिया दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिजीत बिचुकलेला कोरोनाची लागण, ‘बिग बॉस १५’ मध्ये न घेण्याचा निर्मात्यांचा निर्णय

-वाघीण आली परत, सुष्मिता सेनच्या बहुप्रतीक्षित ‘आर्या २’ वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

-ग्लोबल ट्रेंडिंग कपल असणाऱ्या प्रियांका चोप्रा आणि निक जोनासची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होती पांढरे

हे देखील वाचा