बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. ऍडल्ट फिल्म प्रकरणात अडकलेला राज कुंद्रा जेव्हापासून बाहेर आला आहे, तेव्हापासून तो पॅपराझींसमोर नेहमीच चेहेरा दाखवणं टाळतो. आजकाल, तो त्याच्या फेस मास्कसाठी बरेचदा चर्चेत असतो. आता अलीकडेच राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, या व्हिडिओमध्ये शिल्पा घाबरलेल्या अवस्थेत हसताना दिसते.
शिल्पा शेट्टी (shilpa shetty) आणि राज कुंद्रा (raj kundra) याचा व्हिडिओ साेशल मीडियावर प्रचंड व्हायरल हाेत आहे. या व्हिडिओमध्ये पती-पत्नी दोघेही चित्रपट निर्माते रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीतून बाहेर पडताना दिसत आहे. यादरम्यान, ती मरून फ्यूजन साडी आणि बेल्टमध्ये सुंदर दिसत आहे, तर दुसरीकडे राजने काळा कुर्ता घालुन मास्कने त्याचा चेहरा झाकला होता. यादरम्यान शिल्पा शेट्टी मस्ती करत बाहेर येत असते. अशात अचानक बाहेर येणा-या पॅपराझी मागे वळून पाहा असे म्हणताे, त्यानंतर अभिनेत्री मागे वळून पाहते आणि अचानक हसायला लागते. त्यानंतर पॅपराझी राज कुंद्राची खिल्ली उडवत त्याला ‘स्पायडरमॅन’ म्हणतात.
View this post on Instagram
या हावभावामुळे राज कुंद्रा चांगलाच ट्रोल होत आहे. यूजर्स त्यांच्या या कृतीला खूप वाईट म्हणत आहेत. एका यूजने कमेंट करत लिहिले की, “ही काय नाैटंकी आहे.” दुसर्या यूजरने लिहिले की, “त्याचे वागणे खूपच वाईट झाले आहे. दिवाळीच्या पार्टीला असं कोण जातं? एवढी लाज वाटत असेल तर घर सोडू नका. तुम्ही लक्ष वेधण्यासाठी हे सर्व करत आहात, ही गोष्ट आता थांबवायला हवी.” आणखी एका यूजरने लिहिले की, ” कदाचित शिल्पाला त्याच्या वागण्याची लाज वाटत असेल”. अशाप्रकारे या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
मोठी बातमी! रितेश अन् जिनिलिया अडचणीत? भाजपने लावला सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप
शर्लिन चोप्राने केली साजिद खानविरोधात तक्रार, ‘बिग बॉस 16’ मधून काढण्याची विनंती