Wednesday, December 6, 2023

‘…तर गप्पच बसा’ तब्बल एका वर्षानंतर राज कुंद्राने अश्लिल चित्रफित प्रकरणावर दिली पहिली प्रतिक्रिया

शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) यांची गेल्या वर्षी २१ सप्टेंबर रोजी जामिनावर सुटका झाली होती. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी याबाबत कधीच काही बोलले नाही पण आता वर्षभरानंतर त्यांनी या प्रकरणावर मौन सोडले आहे. राज कुंद्रा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली बाजू लोकांसमोर मांडली आहे. सध्या त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

राज कुंद्राला  अश्लील चित्रपट बनवल्याबद्दल बराच काळ तुरुंगात राहावे लागले होते. जुलै 2021 मध्ये चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणावर आता राजने ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज कुंद्राने ट्विटरवर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण कथा माहीत नसेल तर गप्प बसा, असे लिहिले आहे. या पोस्टसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आर्थर रोड जेलमधून बाहेर येऊन आज एक वर्ष झाले. योग्य वेळ आल्यावर न्याय नक्कीच मिळेल. सत्य लवकरच बाहेर येईल. शुभचिंतकांचे आभार. मला ट्रोल करणार्‍यांचेही आभार,” ज्यांच्यामुळे मी इतका मजबूत झालो आहे.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राज कुंद्राने स्वतःला निर्दोष घोषित केले होते. एका मुलाखतीदरम्यान तो म्हणाला होता की मी अशा कोणत्याही गोष्टीत अडकलो नाही. त्यानुसार त्याला जबरदस्तीने या प्रकरणात गोवण्यात आले आहे. देशाच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचं त्याने मुलाखतीदरम्यान म्हटलं होतं. या प्रकरणातून सुटका करून घेण्यासाठी राज यांनी कोर्टातही धाव घेतली आहे. अलीकडेच त्याची याचिका दाखल करून स्वतःला निर्दोष घोषित केले होते. या याचिकेत त्याने न्यायालयाला विनंती केली होती की, या प्रकरणात आजपर्यंत आपल्याविरुद्ध कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत, त्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता करण्यात यावी.

हेही वाचा- रवी जाधव म्हणजे मराठी सिनेसृष्टीत दणक्यात ‘टाईमपास’ करणारा ‘पक्का लिंबू’
‘मला तुमचं ऐकायचं आहे…’, मुख्यमंत्र्यांनी मराठी कलाकारांशी साधला संवाद, ‘हे’ होते खास कारण
‘परत या राजूजी…’ कॉमेडीयनच्या मृत्यूवर शैलेश लोढाची भावूक पोस्ट व्हायरल

हे देखील वाचा