Sunday, April 14, 2024

चाळिशी पार केलेल्या शिल्पाचा मोडला पाय, तरीही व्हीलचेअरवरून देतेय फिटनेसचे धडे, गरोदर महिलांना म्हणाली…

काही अभिनेत्री अशा असतात, ज्यांच्याकडे पाहून वाटत नाही की, त्यांनी खरंच चाळिशी पार केलीये. अशीच एक अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी होय. शिल्पा शेट्टी ही स्वत:ला फिट ठेवण्यासाठी योगा आणि वर्कआऊट करत असते. यासोबतच ती तिच्या चाहत्यांनाही फिटनेसचा गुरूमंत्र देत असते. मात्र, फिटनेसबद्दल चाहत्यांना जागरूक करणाऱ्या शिल्पाचा पाय ‘इंडियन पुलिस फोर्स’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दुखापतग्रस्त झाला. यामुळे तिला तब्बल १० दिवस विश्रांती घ्यावी लागली. यानंतर आता तिने पुन्हा एकदा स्ट्रेचिंगचा सराव करण्यास सुरुवात केली आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून चाहतेही आनंदी झाले आहेत.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती व्हील चेअरवर बसूनच योगाचा सराव करताना दिसत आहे.

व्हील चेअरवर शिल्पाचा सराव
शिल्पा हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती व्हील चेअरवर बसलेली दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत शिल्पाने सांगितले आहे की, तिला हे सर्व न करण्याचे कोणतेही कारण सापडले नाही. तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, “१० दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर मला जाणवले की, स्ट्रेचिंग न करण्यासाठी कोणतेही कारणच नाहीये. ही दुखापत झाल्यामुळे मला जरी काही आठवडे विश्रांती घ्यावी लागली असली, तरी मला ती निष्क्रिय बनवू शकते. त्यामुळे मी पर्वतासनच्या दिनचर्येचा सराव करण्याचा निर्णय घेतला. यानंतर उत्थिता पार्श्वकोणासनचा सराव केला आणि भारद्वाजसनाने संपला.”

चाहत्यांना दिली प्रेरणा
यापुढे शिल्पाने त्या सर्व व्यक्तींना प्रेरणा दिली, जे चालू किंवा फिरू शकत नाहीत आणि योगासन करू शकत नाहीत. यावर तिने लिहिले की, “कोणताही व्यक्ती ज्याला जमिनीवर बसता येत नाही, किंवा गुडघ्यांचा किंवा पाठीचा त्रास होतो, त्यांना हे आसन खुर्चीवर बसून करता येऊ सकतात. हे आसन मणका आणि पाठीच्या मांसपेशीमधील लवचीकता मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहेत. तसेच, हे पचनसंस्थेसाठीही सहाय्यक असतात.”

प्रेंग्नंट महिलांना दिली चेतावनी
यासोबतच शिल्पाने तिच्या व्हिडिओमध्ये एका आसनाबाबत प्रेग्नंट महिलांना चेतावनीही दिली. तिने लिहिले की, “तिसरे आसन ‘भारद्वाजसन’ यामुळे गर्भावस्थेदरम्यान टाळले पाहिजे. कोणतीही गोष्ट तुमच्या दिनचर्येदरम्यान येता कामा नये. तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि गोष्टी बदलण्याची इच्छा बाळगून सर्वात मोठ्या अडचणी दूर करू शकतात.”

शिल्पा हिच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती शेवटची सन २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हंगामा २’ या सिनेमात झळकली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीचा लूक पाहून चाहते हैराण, ओळखणेही झाले कठीण
वयाने १२ वर्षे लहान अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती सोनाली फोगाट, वाचा किस्सा
सपना चौधरी विरोधात अटक वारंट जारी, पाहा काय आहे प्रकरण

हे देखील वाचा