Thursday, June 12, 2025
Home बॉलीवूड व्हिडिओ: राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच दिसली सेटवर; चेहऱ्यावर होती उदासी

व्हिडिओ: राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच दिसली सेटवर; चेहऱ्यावर होती उदासी

आपल्या परिवारातील अथवा आपल्या जवळील व्यक्ती संकटात असली की, आपलं लक्ष कशातच लागत नाही. अशाच प्रसंगातून अभिनेत्री शिल्पा शेट्टी जात आहे. शिल्पाचा पती राज कुंद्राला अश्लील चित्रपट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. गेल्या महिन्यापासून राज तुरुंगात आहे. त्याच्या या सर्व प्रकरणांमुळे शिल्पाला देखील कठीण काळाचा सामना करावा लागतोय.

राज कुंद्राने अश्लील चित्रपट बनवल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली. परंतु असं झाल्यानंतर त्याने त्याचा प्लॅन बी देखील रेडी ठेवला होता. राजचा पीए उमेश कामत याच्या मोबाईल चॅटमधून हा प्रकार समोर आला होता. (Actress Shilpa Shetty on Set of Super Dancer 4 For 1st Time After Raj Kundra Arrested Sadness Appeared On Her Face)

राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टीला ‘बिग बॉस’च्या घरात पाहून पुन्हा एकदा चर्चेला जोर आला होता. शिल्पा शेट्टीला या सर्व गोष्टींचा त्रास होत असल्याने काही दिवस ती सोशल मीडियापासून दूर राहिली. शिल्पाने ‘सुपर डान्सर ४’ मधून देखील राम राम घेतला होता.

यादरम्यान अनेक नेटकऱ्यांनी शिल्पाला ‘सुपर डान्सर ४’ मधून काढून टाकले, निर्माते तिला आता परत या शोमध्ये घेणार नाहीत, अशा अफवा पसरल्या होत्या. परंतु शिल्पाने थोड्या दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा या शोमध्ये पुनरागमन केले आहे. तिचे सेटवर जातानाचे काही व्हिडिओ सध्या व्हायरल होतायत. यामध्ये कायम चेहऱ्यावर हसू असलेली अभिनेत्री उदास दिसून आली.

शिल्पानंतर या शोमध्ये अनेक कलाकार पाहुणे म्हणून तिच्या जागी येत होते. तसेच ‘सुपर डान्सर ४’ च्या निर्मात्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, शिल्पा नाही तर काम करण्यात कुणालाच उत्साह दिसत नाहीये. कुटुंबातील एखादी व्यक्ती नसेल, तेव्हा जसं सूनं सूनं वाटतं, तसं वातावरण सेटवर निर्माण झालंय, असं त्यांनी म्हटले होते. परंतु आता पुन्हा एकदा शिल्पाने या शोमध्ये पुनरागमन केल्यामुळे ‘सुपर डान्सर ४’ चे पुढील भाग नेमके कसे असतील याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘हे’ आहेत अफगाणिस्तान अन् तालिबानवर आधारित आतापर्यंतचे सर्वोत्तम चित्रपट; अजूनही पाहिले नसतील, तर एकदा पाहाच

-शर्मिला टागोरांनी बिकिनी घातल्यामुळे झाला होता मोठा वाद; फोटो पाहून टायगर पतौडींची होती ‘अशी’ प्रतिक्रिया

-प्रतिभावान अभिनेता असूनही रणवीर शोरीच्या वाट्याला आल्या कायम सहाय्यक भूमिका, पण वैयक्तिक आयुष्यामुळे मिळाली जास्त प्रसिद्धी

हे देखील वाचा