अरे वाह! शिल्पानं मुलगा वियान अन् मुलगी समीषासाेबत काढली रांगाेळी, पाहा भन्नाट व्हिडिओ

0
79
shilpa-shetty
photo courtesy: instagram/theshilpashetty

आज म्हणजेच 24 ऑक्टोबर रोजी संपूर्ण देश दिवाळीचा सण साजरा करत आहे. अशा स्थितीत चित्रपटसृष्टी मागे कशी राहणार? अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिनेही हा सण उत्साहात साजरा करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. शिल्पा शेट्टी अशा स्टार्सपैकी एक आहे जी प्रत्येक सण आपल्या घरी धूमधडाक्यात साजरा करते. यापूर्वी तिच्या घरी नवरात्रीचा थाट पाहायला मिळाला हाेता. तर दिवाळीनिमित्त अभिनेत्रीने एका पार्टीचे आयोजन देखील केले होते. यासोबतच आता अभिनेत्रीने आपल्या दोन मुलांसह रांगोळी काढण्याचा व्हिडिओ चाहत्यांसाेबत शेअर केला आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी (shilpa shetty) हिने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती मुलगा विआन आणि मुलगी समिशासोबत रांगोळी काढताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, “आमच्या वार्षिक परंपरेचे पालन करणे.. रांगोळीचा काळ.. आशा आहे की, हे वर्ष तुम्हाला आरोग्य, सकारात्मकतेचा प्रकाश आणि भरपूर समृद्धीचे जावो. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला धनत्रयोदशीच्या आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.” शिल्पा दरवर्षी तिच्या घरी स्वतःच्या हाताने रांगोळी काढते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

रविवारी म्हणजेच 23 ऑक्टोबर रोजी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांच्या घरी दिवाळी पार्टी आयोजित केली होती. यावेळी दिवाळी पार्टीत अनेक स्टार्स उपस्थित होते. या पार्टीत सर्वप्रथम अनिल कपूरने प्रवेश केला. यावेळी तो पांढऱ्या कुर्ता पायजमामध्ये दिसला. त्यानंतर या पार्टीत अभिनेता सोनू सूद आणि हरमन बावेजा त्यांच्या पत्नीसह पोहोचले. सलमान खानची बहीण अर्पिता खान तिचा पती आयुष शर्मा साेबत पार्टीत पाेहचली हाेती. पार्टी संपल्यानंतर शिल्पाने मीडियालाही मिठाई वाटली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
जगावेगळंच! मल्लिका लवकर झोपते म्हणून बॉयफ्रेंडला असते ‘ही’ तक्रार, अभिनेत्रीचा मोठा खुलासा

बाबाे! शिव ठाकरे अन् शालीन भानोत यांच्यात जाेरदार भांडण, पाहा व्हायरल व्हिडिओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here