Monday, July 15, 2024

जगावेगळंच! मल्लिका लवकर झोपते म्हणून बॉयफ्रेंडला असते ‘ही’ तक्रार, अभिनेत्रीचा मोठा खुलासा

मल्लिका शेरावत बॉलिवूडच्या बोल्ड अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तिची जबरदस्त स्टाईल कोणालाही वेड लावू शकते. चित्रपटसृष्टीत ती फारशी सक्रिय नसली, तरी सोशल मीडियावर तिची उपस्थिती कायम आहे. मल्लिका सतत तिचे सुंदर आणि हॉट फोटो शेअर करत असते. ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही मोकळेपणाने बोलत असते. आता पुन्हा एकदा तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे, ज्याची खूप चर्चा होत आहे. मल्लिका शेरावतने तिच्या बॉयफ्रेंडबद्दल खुलासा केला आहे.

मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) नुकतीच मंदिरा बेदीच्या ‘द लव्ह लाईफ लाईव्ह’ या टॉक शोमध्ये पोहोचली होती. या शोमध्ये पोहोचल्यावर मल्लिकाने तिच्या चित्रपट कारकिर्दीव्यतिरिक्त तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले. ती तिच्या बॉयफ्रेंडबद्दलही खूप काही बोलली आहे. मल्लिकाने शोमध्ये तिच्या बॉयफ्रेंडची ओळख न सांगता ती काही काळ रिलेशनशिपमध्ये असल्याचे उघड केले आहे. ती बॉयफ्रेंडसोबत तिचे भविष्यही पाहत आहे.

मल्लिकाने सांगितले की, बॉयफ्रेंडसोबत तिची पहिली भेट फ्रान्समध्ये झाली होती. त्यासह तिने सांगितले की, तिचा बॉयफ्रेंड तिच्या झोपण्याच्या सवयीबद्दल खूप तक्रार करत आहे. मल्लिका लवकर झोपते, तेव्हा तिचा प्रियकर तिला ‘नन’ म्हणतो. मल्लिकाने म्हटले आहे की, स्क्रीनवर तिची ‘ग्लॅमरस’ इमेज आहे आणि प्रत्येकजण असे गृहीत धरतो की, ती अनेकदा पार्टी करते आणि मद्यपान करते, परंतु असे नाही.

मल्लिका म्हणाली की, “मला पार्टी कल्चर अजिबात आवडत नाही. मला जीवन अध्यात्मिक आणि समग्र पद्धतीने जगायला आवडते. मला लवकर झोपायला आवडते. माझा बॉयफ्रेंड नेहमी तक्रार करतो की, अरे देवा, तू नन आहेस का? तू नेहमी लवकर झोपतेस.” याशिवाय ‘द लव्ह लाईफ लाईव्ह’ शोमध्ये मल्लिकाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि बॉयफ्रेंडबद्दल बरेच काही सांगितले आहे.

मल्लिकाने नुकताच तिचा 45 वा वाढदिवस साजरा केला होता. तिचा जन्म 24ऑक्टोबर, 1976 रोजी हरियाणातील हिसार येथे झाला होता. मल्लिकाने चित्रपटांमध्ये प्रवेश करण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. ‘मर्डर’, ‘शादी से पहले’, ‘वेलकम’, ‘डबल धमाल’, ‘किस्मत लव पैसा’ आणि ‘डर्टी पॉलिटिक्स’ यांसारख्या चित्रपटात तिने काम केले आहे. मल्लिका शेवटची ‘नकाब’ या वेबसीरिजमध्ये दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘बोल्ड सीनमुळे दिला होता खालच्या पातळीची महिला म्हणून टॅग’, मल्लिका शेरावतचा खुलासा

जेव्हा पितृसत्तेचा विरोध करत मल्लिकाने झापले वडिलांना; म्हणाली होती, ‘तू मला जन्म दिलास म्हणून…’

हे देखील वाचा