Tuesday, July 9, 2024

‘बालिका वधू २’ अचानक बंद होण्याचे कारण आले समोर, अभिनेत्री शिवांगी जोशीने केला याचा खुलासा

‘बालिका वधू २’ बंद होणार असल्याच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. नुकतीच अशीही माहिती देण्यात आली होती की, हा शो आता वुटवर प्रदर्शित होणार असून तो टेलिव्हिजनवर बंद केला जाणार आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शिवांगी जोशीने निर्मात्यांनी असा निर्णय का घेतला याचा खुलासा केला आहे. शिवांगी जोशीने सांगितले की, हा शो आता फक्त वूटवर का दाखवला जाईल, टेलिव्हिजनवर नाही.

शिवांगी जोशीने सांगितले सत्य

माध्यमांशी केलेल्या संभाषणात शिवांगी जोशीने (Shivangi Joshi) सांगितले की, ‘बालिका वधू’ने (Balika Vadhu) टीव्हीवर फारसे प्रदर्शन केले नाही. परंतु प्रेक्षक ही मालिका ओटीटीवर पाहतात. त्यामुळे निर्मात्यांनी ती टीव्हीवर प्रसारित न करण्याचा निर्णय घेतला. ती म्हणाली की, “हो, या मालिकेने टीव्हीवर विशेष काही केले नाही, पण ओटीटीवर चांगली कामगिरी केली. दोन्ही माध्यमांचे प्रेक्षक वेगवेगळे आहेत. म्हणूनच आम्हाला आनंद आहे की, आता ती ओटीटीवर येईल आणि तिला नवीन प्रेक्षक मिळतील. ‘बालिका वधू’ची ही नवीन संकल्पना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. कथा खूप मनोरंजक आणि कनेक्टिंग आहे.

काय असेल वेगळे 

शिवांगी जोशी पुढे म्हणाली की, ओटीटीवरील ‘बालिका वधू’ची कथा टेलिव्हिजनपेक्षा पूर्णपणे वेगळी असेल. जेव्हा शिवांगी जोशीला विचारण्यात आले की, मालिकेचा पुढचा सीझन दीर्घ गॅपनंतर आल्याने प्रेक्षकांचा संपर्क तुटू शकतो असे तिला वाटत नाही का? या प्रश्नाला उत्तर देताना शिवांगी जोशी म्हणाली की, प्रेक्षकांना आजही आनंदी खूप आवडते. ती म्हणाली की, “मला तसे वाटत नाही कारण त्या पात्राला खूप प्रेम मिळाले आहे आणि ते प्रेम अजूनही आहे. नायरा (ये रिश्ता क्या कहलाता है) १० वर्षांच्या ब्रेकनंतर परत आणली तरी लोकं डिस्कनेक्ट होणार नाहीत. काही काळ दाखवला नाही, तर तो सीन तर होईलच, पण ती पात्रं पुन्हा पाहिल्यावर प्रेम देऊ लागतात.”

निर्मात्याने असेही सांगितले …

माध्यमांशी संवाद साधताना शोचे निर्माते संजय वाधवा यांनी नवीन कलाकारांमुळे शो चालत नसल्याच्या अफवा फेटाळून लावल्या होत्या. ते म्हणाले होते की, “सीरियलमधील लीप्स आणि स्टोरीलाइनमुळे गोष्टी खूप वेगाने बदलतात. आम्ही शिवांगीला मुख्य भूमिकेत आणले हे खरे आहे पण शो ऑफ एअर होण्यासाठी शोची स्क्रिप्ट किंवा कलाकारांचा अभिनय जबाबदार नाही. कधीकधी शो अयशस्वी होण्याचे काहीच कारण नसते. आम्ही त्याच्यावर रडत बसू शकत नाही.”

२००८ मध्ये ‘बालिका वधू’चा झाला प्रीमियर 

‘बालिका वधू’ २००८ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि ही कथा एका मुलीची होती जिला बालविवाहात ढकलले जाते. या शोमध्ये अविका गौर आणि अविशान मुखर्जी मुख्य भूमिकेत होते. ती मोठी झाल्यानंतर प्रत्युषा बॅनर्जी आणि सिद्धार्थ शुक्ला दिसले. गेल्या वर्षीपासून या शोचा दुसरा सीझन टीव्हीवर प्रसारित होत आहे.

हेही वाचा – 

हे देखील वाचा