Friday, April 26, 2024

‘सॅम मला रात्री एकाच जागेवर…’ लॉकअप शोमध्ये पूनम पांडेने केला मोठा खुलासा

कंगना रणौत होस्ट करत असलेला रिऍलिटी शो ‘लॉकअप’ बदमाश जेल अत्याचारी खेल’ मध्ये दुसऱ्या दिवशी विवाद चालू झाला आहे. मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेने पूर्व पती सॅम बॉम्बेसोबत असणाऱ्या दुःखद नात्याचा या शोमध्ये खुलासा केला आहे.

पूनमने सांगितले की, तिला सॅम आवडत नाही. तिने सांगितले की, “जेव्हा त्यांचे लग्न झाले तेव्हा त्यांचे घर चार मजली होते. परंतु तरी देखील सॅम तिला दुसऱ्या रूममध्ये राहू देत नव्हता आणि एकाच रूममध्ये राहण्यास सांगत होता.

पूनमने हे देखील सांगितले की, तिला तिच्या घरात असताना फोनला हात लावण्याची देखील परवानगी नव्हती. तिने खुलासा केला की, “सॅम तिला डोक्यात एकाच जागेवर मारत असायचा. त्यामुळे तिला ब्रेन हॅमरेज होऊ शकते होते. तो सकाळी १० वाजता दारू पिण्यास सुरुवात करायचा आणि मध्यरात्रीपर्यंत हेच करायचा.”

त्यांचे लग्न एका‌ वर्षातच तुटले होते. नोव्हेंबर २०२१ मध्ये पूनमला हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी सॅमला अटक केले होते.

‘लॉक अप’ या शोबद्दल बोलायचे झाल्यास, स्पर्धकांना दोन टीममध्ये विभागले आहे. त्यांना त्यांच्या ड्रेसची कलर वरून ओळखले जाते. ऑरेंज टीम राईट ब्लॉक ब्ल्यू टीम लिफ्ट ब्लॉक आहे. करणवीर, पायल, सिद्धार्थ श्रम, बबिता, अंजली अरोरा, पुनम आणि मुनव्वर फारुकी हे सदस्य ऑरेंज टीममध्ये आहेत, तर तहसीन पूनावाला, निशा रावल, शिवम शर्मा, स्वामी चक्रपाणी महाराज, सारा खान आणि सायशा शिंदे हे ब्ल्यू टीममध्ये आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा