‘झुंड’ चित्रपट पाहिल्यानंतर धनुषने दिली त्याची पहिली प्रतिक्रिया, कलाकारांचे केले तोंड भरून कौतुक

मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा चित्रपट ४ मार्च रोजी सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी तयार आहे. चित्रपटात बॉलिवूड किंग अमिताभ बच्चन, ‘सैराट’ फेम आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू हे या चित्रपटात आहे. चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. अनेकांना हा ट्रेलर आवडला आहे. अनेक कलाकारांना हा चित्रपट आवडला आहे. अनेक कलाकार या चित्रपटाच्या कौतुक करत आहेत. अशातच दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषने ‘झुंड’ चित्रपटाचे कौतुक केले आहे.

नागराज मंजुळे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये धनुष ‘झुंड’ चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहे. . या व्हिडिओमध्ये तो म्हणतो की, “हा तर मास्टरपिस आहे, असं म्हणत धनुषने एका शब्दात सिनेमाच कौतुक केलं आहे. ‘मला कळत नाहिये मी काय बोलू, पण खूप छान आहे हा सिनेमा. या सिनेमातील संदेश खूप महत्वाचं आहे. मी या सिनेमातील हजारपेक्षा जास्त चांगल्या टेक्निकल गोष्टी सांगू शकतो. हा सिनेमा प्रत्येकाना पाहावा. या पाहण्याचा अनुभव प्रत्येकानं घ्यावा. हा मास्टरपीस आहे. हा सिनेमा अनेकांचे लक्ष वेधणार यात शंकाच नाही.”

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पुढे तो म्हणतो की, “झुंड पाहिल्यावर मला खूप आनंद झाला. सिनेमातील सगळ्या कलाकारांचं कौतुक त्यांनी मन जिंकलं आहे. अमिताभ बच्चन तुम्ही खूपच छान काम केले आहे. पूर्ण टीमनं चांगलं काम केले आहे. नागराजचे मी आभार मानतो त्याने एवढा चांगला सिनेमा तयार केला. मी सर्व टीमला शुभेच्छा देतो.” ‘झुंड’ ,हा चित्रपट स्लम सॉकरटचे संस्थापक विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे. अमिताभ बच्चन हे या चित्रपटात फुटबॉल कोच ही भूमिका साकारणार आहेत.

बॉलिवूड अभिनेता आमिर खानने देखील ‘झुंड’ या चित्रपटाचे कौतुक केले आहे. तो म्हणाला की, ‘माझ्याकडे काही शब्दच नाहीत व्यक्त होण्यासाठी…तू जो भारतातील तरूणाईच्या भावना ज्या समजून घेतल्यास ना, त्याचं विशेष कौतुक आहे. सिनेमात ज्या मुलांनी काम केलंय. त्याचं देखील विशेष कौतुक. काय सिनेमा बनवला आहे यार? Fantastic.. खूपच युनिक सिनेमा आहे. जी स्पिरिट तुम्ही कॅच केलंय ते लॉजिकने येत नाही.”

‘झुंड’ हा चित्रपट फुटबॉलवर आधारित आहे. अमिताभ बच्चन हे कोचच्या भूमिकेत दिसत आहे. जे चाळीतील मुलांना एकत्र घेऊन त्यांना फुटबॉल शिकवतात आणि इंटनरनॅशनल गेमसाठी तयार करतात.

हेही वाचा :

Latest Post