‘भुतासारखी का दिसतेय?’ काळी लिपस्टिक लावल्यामुळे अभिनेत्री श्रुती हासन झाली ट्रोल

Shruti Hassan give answer to people who troll her for black lipstick


दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंत आपला अभिनय आणि लूक्समुळे प्रसिद्ध असणारी अभिनेत्री म्हणजे श्रुती हासन. चित्रपटात सोबतच ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. ती तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. श्रुतीला काळ्या आणि लाल रंगाची लिपस्टिक खूप आवडते. तिने जेव्हा काळ्या रंगाच्या लिपस्टिकमध्ये सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते, तेव्हा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. एवढंच नव्हे, तर अनेक युजरने तिला भूत असे देखील म्हटले होते.

श्रुतीने तिच्या एका मुलाखतीत याबाबत भाष्य केले होते. तिने सांगितले होते की, “मी हे सुरूच ठेवणार आहे. मी हे एखाद्या चित्रपटासाठी आणि रोलसाठी तेव्हापर्यंत नाही करणार जोपर्यंत या गोष्टीला मागणी नाही. मला हे असंच नाही आवडणार. मी काळी लिपस्टिक लावेल आणि बाहेर उन्हात देखील जाईल. मला हे करायला खूप आवडेल पण पुन्हा मी हा विचार करते की, हे काही जास्त तर नाही ना होणार. परंतु जर मला हे करण्याचा मूड झाला, तर मी हे नक्की करेल.”

श्रुतीने हे देखील सांगितले की, लोकांना तिच्या बाबतीत खूप गैरसमज झाले आहेत. ती म्हणाली की, “माझ्या बाबतीत एवढे गैरसमज यामुळे असावेत, कारण मी एका आदर्शवादी पद्धतीने मोठी झाली आहे. मला गॉथिक सबकल्चर खूप आवडते.”

श्रुतीने काळी लिपस्टिक लावल्यावर तिला अनेकांनी ‘भूत’ असे म्हटले होते. तिने त्या लोकांना देखील चांगलेच उत्तर दिले आहे. तिने सांगितले की, ती लोकांच्या या कमेंटसोबत सहमत आहे, कारण तिने हे सगळं कौतुकाच्या दृष्टीने घेतले.

तिने सांगितले की, “मला अशा कमेंट्स येतात की, तुला काय झालं आहे, तू अशी भुतासारखी का दिसत आहे? मला असं वाटतं की, हे सगळं ठीक आहे, छान आहे, कूल आहे. कारण भूत खराब असते म्हणून मला ते आवडते. जेव्हा ते मला भूत म्हणतात, तेव्हा त्यांना या गोष्टीची जाणीव नसेल की, ते माझे कौतुक करत आहेत. हे माझ्यासाठी खूप चांगले आहे.”

श्रुतीने तिच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटात काम केले आहे. यात ‘रमैया वस्तावया’, ‘येवडू’, ‘क्रॅक’, ‘सिंघम 3’, ‘द पॉवर’, ‘वेलकम बॅक’, ‘गब्बर इस बॅक’ या चित्रपटांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.