Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

श्रुती मराठेच्या साडीमधील फोटोचे चाहत्याकडून कौतुक, म्हणाला, ‘…तेव्हा आणखीनच भारी दिसते’

टेलिव्हिजनवरील ‘राधा ही बावरी’ फेम अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे होय. श्रुतीने अनेक चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम करून तिचे नाव घराघरात पोहोचवले आहे. ‘राधा ही बावरी’ या मालिकेतील तिचे सरळ साधे आणि सालस पात्र सर्वांच्याच मनात घर करून गेले, पण पडद्यावर सालस दिसणारी श्रुती तिच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र खूपच ग्लॅमरस आहे. अनेकवेळा ती ग्लॅमरस तसेच पारंपारिक पोशाखातील फोटो शेअर करत असते. अशातच तिचे साडीमधील काही फोटो समोर आले आहेत.

श्रुतीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही साडीमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये श्रुती नेहमीप्रमाणेच मनमोहक दिसत आहे. तिने अत्यंत सुंदर अशी काठाची साडी नेसली आहे. यावर तिने ईअरिंग घातले आहेत. तसेच गळ्यात मंगळसूत्र घातले आहे. या साडीसोबत ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. (Marathi actress shruti marathe share her photo on social media)

तिच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “ही अशी मान खाली घालून जेव्हा हसतेस, तेव्हा आणखीनच भारी दिसते.” यासोबत आणखी एका चाहत्याने “साज ह्यो तुझा,” अशी कमेंट केली आहे. तसेच बाकी अनेक चाहते या फोटोवर कमेंट करून तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

श्रुती मराठेच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने ‘तप्तपदी’, ‘प्रेमसूत्र’, ‘बंध नायलॉनचे’, ‘अरावण’, ‘शुभमंगल सावधान’, ‘इंदिरा विझा’ ‘सनई चौघडे’, ‘असा मी तसा मी’, ‘रमा माधव’, ‘तुझी माझी लव्ह स्टोरी’, ‘मुंबई पुणे मुंबई २’, ‘स्लॅमबुक’, ‘जागो मोहन प्यारे’ या चित्रपटात आणि मलिकांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-डीप नेक ड्रेसमधील मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकरचे फोटो व्हायरल, सर्वत्र रंगलीय तिच्या लूकची चर्चा

-‘…स्वप्नात तरी करशील का गं लग्न’, ऋतुजा बागवेच्या फोटोवरील कमेंटने वेधले सर्वांचे लक्ष

-‘गोल्डन परी’, संस्कृती बालगुडेच्या सोनेरी रंगाच्या साडीतील फोटोवर चाहत्याची भन्नाट कमेंट

हे देखील वाचा