‘…स्वप्नात तरी करशील का गं लग्न’, ऋतुजा बागवेच्या फोटोवरील कमेंटने वेधले सर्वांचे लक्ष


सोशल मीडिया हा कलाकारांच्या आयुष्यातील अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यांच्या चाहत्यांशी जोडून राहण्यासाठी कलाकार नेहमीच त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. यात ऋतुजा बागवे ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. तिचे अनेक ग्लॅमरस तसेच पारंपारिक लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिचे काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

ऋतुजाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती मॉर्डन लूकमध्ये दिसत आहे. तिने लाल रंगाचा पांढरे डॉट असलेला सुंदर ड्रेस घातला आहे. तसेच तिने कानात ईअरिंग घातले आहेत‌‌ आणि केस मोकळे सोडले आहेत. या फोटोमध्ये ती खूपच मॉर्डन आणि सुंदर दिसत आहे. (Actress Rutuja bagwe share her morden look photos on social media)

तिच्या या फोटोवर तिचे अनेक चाहते प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर लक्षवेधी कमेंट केली आहे. त्याने लिहिले आहे की, “तुझं आवडणंही मला किती सहन करावं लागतं. आधी भरभरून श्वास घ्यावं, मग नंतर गुदमरावं लागतं. तूच माझी प्रियतमा, स्वप्नात तरी करशील का गं लग्न?” यासोबत बाकी अनेक चाहते या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. ऋतुजाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे.

ऋतुजाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २००८ मध्ये ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. पुढे तिने ‘स्वामिनी’, ‘मंगळसूत्र’, ’एका लग्नाची तिसरी गोष्ट’ अशा काही मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या.

यानंतर ऋतुजाने ‘तू माझा सांगती’ आणि ‘नांदा सौख्य भरे’मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. तसेच तिने ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत देखील सुबोध भावेसोबत काम केले आहे. याशिवाय तिने ‘रिस्पेक्ट’ आणि ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे. सध्या ती तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे खूप चर्चेत असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘गोल्डन परी’, संस्कृती बालगुडेच्या सोनेरी रंगाच्या साडीतील फोटोवर चाहत्याची भन्नाट कमेंट

-‘आमची गुळाची ढेप’, म्हणत प्राजक्ता माळीच्या गोड स्माईलचे आणि सौंदर्याचे होते तोंडभरून कौतुक

-आकाशी रंगाच्या साडीमध्ये ‘परमसुंदरी’ दिसणाऱ्या मिथिला पालकरचे फोटो पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात


Leave A Reply

Your email address will not be published.