Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘मी जर तुमच्याबरोबर…’ श्रुती मराठेने केला मराठी इंडस्ट्रीतील कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव शेअर

अभिनेत्री श्रुती मराठे (Shruti marathe) हिने मराठी अभिनेत्रीची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. राधा ही बावरी या मालिकेत अगदी साधे सोज्वळ पात्र घेऊन ती घराघरात पोहोचली. या मालिकेनंतर तिला खूपच जास्त लोकप्रियता मिळाली. त्यानंतर श्रुती अनेक चित्रपटांमध्ये देखील दिसली आहे. परंतु तिने नुकताच मराठी सिनेसृष्टीबाबत एक धक्कादायक अनुभव शेअर केलेला आहे. तिने मराठी सिनेसृष्टीमध्ये देखील कास्टिंग काउचला सामोरे जावं लागतं याबद्दल सांगितले आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्रुतीने सांगितले की, “मुलगी म्हणून मला खूप नाही पण थोड्याफार मर्यादा जाणवल्या. पण तुम्ही जर एखादी चांगली गोष्ट सांगितली तर एवढा प्रॉब्लेम येत नाही. अनेक वर्षांपूर्वी मला मराठीत कास्टिंग काऊचचा अनुभव आलेला होता. कला विश्वात मला काही वर्षे झाली आहे. मी अगदीच नवीनही नव्हते. नटी उपलब्ध असतात, पण आपल्या सिनेइंडस्ट्रीबद्दल गैरसमज आहे. एकतर हे ऐकायला इतकं घाण वाटतं हे कोणी पसरवलं? कुठून सुरू झालं? एखादं काम मिळवण्यासाठी तुम्हाला अमुक एक गोष्ट करावीच लागते हे कुठून आलं?”

पुढे श्रुती म्हणाली की, “मला एका चित्रपटासाठी फायनान्सर भेटायला आले होते. त्यांनी मला सिनेमासाठीच माझं मानधन विचारलं. आम्ही दोघेच बोलत होते तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, तू जर माझ्यासोबत हे केलस तर मी तुला पाहिजे तितकं मानधन देईल. ते हे माझ्या तोंडावर म्हणाले. दोन तीन मिनिटांसाठी मी ब्लॅंक झाले होते. मला घाम सुटायला लागला. या आधी असं कधीच घडलं नव्हतं. त्यामुळे अशा परिस्थितीत काय करायचं हे मला कळत नव्हतं.”

पुढे ती म्हणाली की, “मला वाटलं की, याला काहीतरी उत्तर दिलं पाहिजे. मी त्यांना म्हणाले की, अच्छा म्हणजे मी जर तुमच्याबरोबर झोपले तर तुमची बायको मुख्य अभिनेता सोबत झोपणार का? हे ऐकल्यावर ते म्हणाले की, हे तू काय बोलतेस. पुढे त्यांना म्हणाले मी, असं काहीतरी करेन ही माहिती तुम्हाला कुठून मिळाली कोणाशी बोलताना थोडा तरी अभ्यास करत जा.” अशा प्रकारे सांगितले.

श्रुती मराठी हिने तप्तपदी, शुभलग्न सावधान, सनई चौघडे, सरसेनापती हंबीरराव, धर्मवीर अशा चित्रपटात काम केले आहे. त्यासोबत तिने तमिळ सिनेसृष्टीतही काम केले आहे. सध्या ती निर्मिती क्षेत्रात काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

राखी सावंतच्या अडचणीत वाढ; कोर्टाने हेटाळला अटकपूर्व जामीन, ‘या’ कारणामुळे पूर्वपतीने केली होती तक्रार
‘ते जिवंत आहे पण…’, शीझान खानला वाईट काळात वडिलांनी दिली नाही साथ अभिनेत्याने केला खुलासा

 

हे देखील वाचा