Monday, June 17, 2024

‘ब्लडी ब्रदर्स’ सिरीजमधील मुग्धा गोडसेसोबतच्या किसींग सीनबद्दल श्रुती सेठने केला खुलासा

अभिनेत्री श्रुती सेठ (Shruti Seth) सध्या तिच्या ‘ब्लडी ब्रदर्स’ वेबसिरीजमुळे सगळीकडे चर्चेत आहे. ही वेबसिरीज लवकरच झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून सध्या या सिरीजमधील एका सीनची सगळीकडे चर्चा रंगली आहे. या सिरीजमध्ये श्रुती सेठ आणि मुग्धा गोडसे (Mugdha Godse) यांच्यात एक रोमँटिक किसींग सीन दाखवण्यात आला आहे. आता या सीनबाबत एका मुलाखतीत बोलताना अभिनेत्री श्रुती सेठने एक धक्कादायक खुलासा केला आहे. काय म्हणाली आहे ती नेमकी चला जाणून घेऊ. 
श्रुती सेठही हिंदी चित्रपट जगतातील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सध्या तिच्या ब्लडी ब्रदर्स या सिरीजमधील मुग्धा गोडसेसोबतच्या किसींग सीनची सगळीकडे चर्चा रंगली आहे. याबाबत आता खुद्द श्रुतीने मजेशीर खुलासे केले आहेत. एका मुलाखतीत बोलताना ती म्हणते की, “आम्ही दोघींनीही याआधी अशा प्रकारचा सीन कधीही केला नव्हता. परंतु दिग्दर्शक शाद अलीने आम्हाला हा सीन करण्यासाठी मदत केली. आम्ही हा सीन नैसर्गिक वाटण्यासाठी लगेच पुर्ण केला” असेही ती यावेळी म्हणाली. त्याचबरोबर हा सीन खूपच मजेशीर असल्याचेही तिने सांगितले.
या मुलाखतीत जेव्हा श्रुतीला “हा सीन प्रेक्षकांना आवडेल का?” असे विचारण्यात आले तेव्हा तिने प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहण्यासाठी आपल्याला या सिरीजच्या प्रदर्शनाची वाट पाहावी लागेल असे म्हंटले. त्याचबरोबर श्रुतीने इतक्या मोठ्या कलाकारांसोबत काम करणे म्हणजे अभिनयाच्या विद्यालयात काम करण्यासारखे आहे, अशी प्रामणिक भावना यावेळी व्यक्त केली. दरम्यान ब्लडी ब्रदर्स वेब सिरीजचे दिग्दर्शन शाद अलीने केले आहे. ही सिरीज ‘गिल्ट’ या इंग्रजी सिरीजची थेट हिंदी रिमेक आहे. ज्यामध्ये दोन भावांची कथा रंगवण्यात आली आहे. यामध्ये श्रुती सेठ, मुग्धा गोडसे,जयदीप अहलावत,जीशान अयूब, सतीश कौशिक, टीना देसाई अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची झलक पाहायला मिळणार आहे.

हे देखील वाचा