Sunday, April 13, 2025
Home टेलिव्हिजन आईने चाळिशीत अन् लेकीने विशीत लावला हॉटनेसचा तडका, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, ‘क्या बात है!’

आईने चाळिशीत अन् लेकीने विशीत लावला हॉटनेसचा तडका, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, ‘क्या बात है!’

सिनेविश्वातील कलाकार हे जेवढे प्रसिद्ध असतात, तेवढेच किंबहुना त्याहूनही जास्त त्यांची मुलेही प्रसिद्ध असतात. आपल्या पालकांच्या पावलांवर पाऊल ठेवत ही मुलं इंटरनेट सेन्सेशन बनत असतात. याचा प्रत्यय आपल्याला करीना कपूर आणि सैफ अली खान यांची मुले तैमूर-जेह यांच्यावरून आलाच आहे. अशीच छोट्या पडद्यावरील एक अभिनेत्री आहे, तिची मुलगी बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज आहे. ती अभिनेत्री इतर कुणी नसून श्वेता तिवारी आहे. श्वेताची मुलगी पलक तिवारी ही सध्या जोरदार चर्चेत आहे. अशात तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी (Shweta Tiwari Daughter) पलक तिवारी (Palak Tiwari) ही तिच्या आईप्रमाणे माध्यमांचे लक्ष वेधून घेत आहे. पलक दिवसेंदिवस आणखीच स्टायलिश आणि बोल्ड होताना दिसत आहे. अभिनयासोबतच पलक सोशल मीडियावरही सक्रिय असते. ती नेहमीच तिचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आता तिचे लेटेस्ट फोटोशूट इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

लाल रंगाच्या हॉट ड्रेसमध्ये खूपच दिसतेय बोल्ड
पलक तिवारी हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये पलक ऑफ शोल्डर लाल रंगाच्या हॉट ड्रेसमध्ये दिसत आहे. या फोटोंमध्ये पलक हाय थाय स्लिट गाऊनमध्ये वेगवेगळ्या पोझ देत आहे. या गाऊनसोबत पलकने हिऱ्याचे कानातले घातले आहेत. तिने तिचे केस थोडेसे कुरुळे केले आहेत. या फोटोंमध्ये पलकला पाहून चाहते कावरे-बावरे झाले आहेत.

चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव
पलक तिवारीचे या फोटोवर सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. या फोटोंवर चाहत्यांकडून जोरदार लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तिच्या या फोटोंना १ लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, या पोस्टला पाचशेहून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत. यावर चाहते तिला ‘हॉट’, ‘बोल्ड’ आणि ‘फायर’ असे म्हणत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “आज खूपच हॉट दिसताय मॅडम, फायर आहात तुम्ही फायर.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “हॉटनेसमध्ये आईलादेखील टक्कर देत आहेस.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

या सिनेमात झळकणार पलक तिवारी
पलक हिचे सोशल मीडियावर १९ लाख फॉलोव्हर्स आहेत. तिच्या प्रत्येक फोटोला लाखो लाईक्स मिळतात. याव्यतिरिक्त कामाबाबत बोलायचं झालं, तर ती दीर्घकाळापासून बॉलिवूड पदार्पणामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. पलक लवकरच एका सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणार आहे. तिच्या या सिनेमाचे नाव ‘रोझी: द सॅफ्रोन चॅप्टर’ असे आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

आलियानंतर ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीने वयाच्या ४१ व्या वर्षी दिली गुड न्यूज

‘ही तर वाईफ मटेरियल’, शर्टची बटनं उघडून अभिनेत्रीने सोफ्यावर दिल्या खतरनाक पोझ; फोटो पाहिले का?

सलमान खानसारखी बॉडी करायला कष्ट घेतोय विशाल कोटियन; म्हणाला, ‘मी १६ तास उपाशी…’

हे देखील वाचा