×

‘…मग तुझ्या बापाचं काय जातंय?’, द्वेष करणाऱ्यांना श्वेता तिवारीची जोरदार चपराक

लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) सौंदर्याच्या बाबतीत तरुण अभिनेत्रींनाही टक्कर स्पर्धा देते. वयाच्या ४१व्या वर्षीही श्वेताच्या सौंदर्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. श्वेता तिवारीने एकता कपूरच्या (Ekta Kapoor) ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतील प्रेरणा या भूमिकेतून घराघरात आपली छाप पाडली होती. श्वेता तिच्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. आता अभिनेत्रीने एका पोस्टच्या माध्यमातून तिचा तिरस्कार करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

खरं तर, श्वेता तिवारीने इन्स्टाग्रामवर तिचे काही लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये श्वेता प्रिंटेड ड्रेसमध्ये कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. या सर्व फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देत हसताना दिसत आहे. कॅज्युअल लूकमध्येही अभिनेत्री खूपच सुंदर दिसतेय. हे फोटो शेअर करत श्वेताने एक मजेशीर कॅप्शनही लिहिले आहे. (shweta tiwari gave a befitting reply to her haters by her latest post)

View this post on Instagram

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

श्वेता तिवारीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “ते: इतकं काय हसतेय? मी: तुझ्या बापाचं काय जातंय?” हे कॅप्शन लिहून श्वेताने तिच्या द्वेष करणाऱ्यांना तिच्या खास स्टाईलमध्ये प्रत्युत्तर दिल्याचे स्पष्ट होते.

View this post on Instagram

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

फोटोमध्ये, श्वेता तिच्या आनंदी हास्याने ट्रोलर्सना जळवत आहे. तर दुसरीकडे श्वेता तिवारीची ही पोस्ट तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. श्वेताचे चाहते तिच्या दमदार स्टाइलचे कौतुक करत आहेत. दुसरीकडे, फोटोतील तिच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री पेस्टल कलरचा गाऊन परिधान करून, साध्या स्टाईलमध्येही सुंदर दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post