×

पुन्हा एकदा इब्राहिम खानसोबत स्पॉट झाली पलक तिवारी, यावेळी केला मीडियाचा सामना

मागील काही दिवसांपासून टेलिव्हिजन अभिनेत्री असलेल्या श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी मोठ्या प्रमाणावर लाइमलाईट्मधे येत आहे. कधी तिच्या चित्रपटामुळे, कशी तिच्या म्युझिक अल्बममुळे, कधी तिच्या सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या हजेरीमुळे तर कधी तिच्या इब्राहिम खानसोबतच्या व्हिडिओंमुळे. पलक तिवारीने नुकतेच अभिनयात पदार्पण केले असूनही तिला प्रचंड स्वरुपात लाइमलाइट आणि मीडियाचे अट्रॅक्शन मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी पलक तिवारीला सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम खानसोबत स्पॉट करण्यात आले. तेव्हा तिने मीडियाला पाहून तिचा चेहरा लपवला आणि नंतर ती मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाली. तिला यावरून वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये अनेक प्रश्न देखील विचारले गेले, मात्र तिने असे काही नसल्याचे सांगितले. आता पुन्हा एकदा पलक तिवारीला इब्राहिम खानसोबत स्पॉट केले गेले, मात्र यावेळी तिने तिचा चेहरा न लपवता मीडियाचा खुलेपणाने सामना केला.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

नुकताच पलक तिवारीच्या एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात ती रेस्टोरंटमधून बाहेर पडताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती घाईघाईत बाहेर पडत असून, मीडियाला उशीर होत असल्याचे सांगत आहे. तर दुसरीकडे इब्राहिम कारमध्ये त्याच्या मित्रांसोबत बसलेला दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा अय दोघांच्या नात्यावर प्रश्न विचारायला सुरुवात झाली आहे.

मागच्या वेळेस जेव्हा इब्राहिम आणि पलक या दोघांना एकत्र पहिले गेले तेव्हा मीडियामध्ये आणि सोशल मीडियावर त्यांच्या अफेयरच्या चर्चाना सुरुवात झाली होती. याचे मुख्य कारण होते कॅमेरे पाहून पलकने लपवलेला चेहरा’ लोकांना पलकचे हे वागणे थोडे विचित्र वाटले आणि खटकले. मात्र आता तर तिचा अंदाज एकदमच वेगळा होता. सर्वानाच या दोघांच्या नात्याबद्दल जाणून घ्यायचे आहे, मात्र दोघांनीही ते केवळ चांगले मित्र असल्याचे सांगितले.

इब्राहीमसोबतच्या अफेयरच्या बातम्यांवर एका मुलाखतीमध्ये पलकने सांगितले होते की, “आम्ही चांगले मित्र आहोत. लोकांनी जे काही सांगितले, पसरवले तो फक्त त्यांचा अंदाज होता. यासाठी मी त्याकडे लक्ष दिले नाही. आम्ही बाहेर गेलो आणि आम्ही फसलो बस एवढेच. तेव्हा आम्ही आमच्या मित्रांसोबत होतो, मात्र लोकांना ही गोष्ट जास्त आवडली. आणि त्यांनी ती पसरवली.” पलक तिवारी काही दिवसांपूर्वीच हार्डी संधूच्या म्युझिक अल्बम असलेल्या ‘बिजली- बिजली’मध्ये दिसली होती लवकरच ती विवेक ओबेरॉयसोबत विशाल मिश्रा यांच्या ‘रोजीः द केसर चॅप्टर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post