Monday, June 17, 2024

‘डबल एक्सएल’ चित्रपटासाठी साेनाक्षीने कसे वाढवले वजन? जाणून घ्याच

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या ‘डबल एक्सएल‘ चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे, ज्यामध्ये तिने आपल्या सायरा खन्ना या व्यक्तिरेखेबद्दल सांगितले आहे. बॉडी शेमिंगवर आधारित हा चित्रपट 4 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. सोनाक्षीने तिच्या करिअरमध्ये असे अनेक चित्रपट केले आहेत, ज्यात तिच्या भूमिकेने चाहते वेडे झाले. सोनाक्षी नेहमीच अशा चित्रपटांमध्ये दिसते, ज्यामध्ये ती प्रेक्षकांची मने जिंकू शकते. पण सोनाक्षी तिच्या चित्रपटांची निवड कशी करते? चित्रपट साइन करण्यापूर्वी ती कोणत्या गोष्टींची काळजी घेते? यासर्व प्रश्नांची उत्तरे तिने एका मुलाखती दरम्यान दिले आहे.

मुलाखती दरम्यान, जेव्हा सोनाक्षी (sonakshi sinha) हिला हा चित्रपट साईन करण्याचं कारण विचारलं गेलं तेव्हा तिने सांगितले, “मी या स्टोरीशी खूप संबंधित आहे. हे माझ्यासाठी खूप वैयक्तिक आहे. या व्यक्तिरेखेसाठी मी खूप चांगली तयारी करू शकते, असे मला वाटले. मी याआधी अशी भूमिका कधीच साकारली नव्हती. सोना वजन कमी कर, हे कर-ते करा असे कायमच मला सगळे टोकत होते. मी माझ्या लहानपणी या सगळ्याचा खूप त्रास सहन केला आहे. अभिनयात येण्यापूर्वी मी बरेच वजन कमी केले होते. पण या व्यक्तिरेखेसाठी पुन्हा वजन वाढवण्याची मला खूप भीती वाटत होती. कारण या पात्राच्या मागणीनुसार मला वजन वाढवायचं होतं. पण मी जोखीम पत्करणे आवश्यक मानले आणि वजन वाढवले.”

या आधीही सोनाक्षीने एका मुलाखती दरम्यान सांगितले की,“स्टारकिड्स असण्याचा अर्थ असा नाही की, तुम्हाला काहीही शिकण्याची गरज नाही, तुम्हाला सर्व काही आधीच माहित आहे. तसं अजिबात नाही, मी जे काही शिकले ते सेटवर जाऊनच शिकले. मोठ्या स्टारची मुलगी असल्याने घरातच सगळे काही येत असे नाही. सेटवरच्या गोष्टी पाहूनच मी आज इथपर्यंत पोहोचले आहे.”

मुलाखतीत तिच्या व्यक्तिरेखेचे ​​वर्णन करताना सोनाक्षी म्हणते, “डबल एक्सएल चित्रपटात अशी अनेक दृश्ये आहेत , ज्यात मला जेव्हा रागावले जाते तेव्हा मी जास्त खायला लागते. एका दृश्यादरम्यान मी थोडी भावूक झाली, कारण मला अजूनही आठवते की, लहानपणी जेव्हा मला तणाव यायचा तेव्हा मी अधिक खायची. या दृश्यादरम्यान माझ्या डोळ्यात पाणी आले. खरंतर मला फॅशन डिझायनर व्हायचं होतं. पण तुम्ही ज्या वातावरणात वाढता, तिथे लोकांना तुम्हाला एका सेट पॅटर्नमध्ये बघायचे असते. तुम्हाला एका मस्त गँगमध्ये सामील व्हावं लागेते जिथे लोक फॅशन, बॉडी याबद्दल बोलतात. हा चित्रपट सांगताना मी पूर्वी ज्या काळात जगले त्याच काळात परत आल्यासारखे वाटले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona) 

बॉडी शेमिंगवर आधारित या चित्रपटात सोनाक्षी सिन्हाशिवाय तिचा कथित बॉयफ्रेंड झहीर इक्बाल आणि हुमा कुरेशी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या स्क्रिप्टच्या मागणीवरून या दोन्ही अभिनेत्रींनी, त्यांची व्यक्तिरेखा उत्तमरित्या सादर करण्यासाठी त्यांचे वजन अधिक वाढवले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
खुशखबर! दिवाळीच्या आधीच ‘भाईजान’चा मोठा धमाका, चाहत्यांना ‘टायगर 3’ रिलीज डेट टाकली सांगून
एकेकाळी ‘गुड्डू भैय्या’कडे कॉलेजची फी भरायलाही पैसे नसायचे, पहिल्या पगाराचा आकडा माहितीये? वाचा अलीची संघर्षगाथा

हे देखील वाचा