Tuesday, July 9, 2024

महाराष्ट्राच्या अप्सरेचा ग्लॅमरस लूक आला समोर, चाहत्यांना नजर हटविणेही झाले कठीण

अनेक चित्रपट,‌‌ नाटक आणि डान्स करून नावारूपाला आलेली सोनाली कुलकर्णी ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर तिचे लाखोंनी चाहते आहेत. आजकाल तर तिचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. तिच्या चाहत्यांशी जोडून राहण्याची एकही संधी ती सोडत नाही. आयुष्यातील प्रत्येक घटना ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या निरनिराळ्या स्टाईलचे दर्शन आपल्याला इथून मागे झालेच आहे. अशातच तिचा एक ग्लॅमरस लूक समोर आला आहे.

सोनालीने अलीकडेच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, ती अत्यंत ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. तिने गुलाबी रंगाचा साईड कट ड्रेस घातला आहे. कानात मोठे ईअरिंग आणि पायात हाय हिल्स घातले आहेत. या फोटोमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. (Actress sonalee Kulkarni share her glamorous photos on social)

तिचा हा लूक ‘झिम्मा’ चित्रपटाच्या प्रमोशन वेळीचा आहे. तिच्या या फोटोवर तिचे चाहते अनेक प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या अनेक चाहत्यांनी या फोटोवर हार्ट ईमोजी पोस्ट केल्या आहेत.

सोनालीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि डान्सर देखील आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने तिच्या करिअरमध्ये ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘हिरकणी’, ‘ग्रँड मस्ती’, ‘पोश्टर गर्ल’, ‘क्लासमेट’, ‘धुरळा’, ‘हंपी’, ‘शटर’, ‘अजिंठा’, ‘ती आणि ती’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘मस्ती’, सिंघम रिटर्न्स’ यांसारख्या अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. यासोबतच ती लवकरच ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता. नुकतेच तिचा ‘झिम्मा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तसेच ती ‘पांडू’ या चित्रपटात देखील दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शोएब- दीपिकाच्या कुटुंबातील ‘या’ सदस्याने गमावले प्राण, लाडक्याच्या जाण्याने अभिनेत्रीला अश्रू अनावर

-जेव्हा आपला चित्रपट बघण्यासाठी चित्रपटगृहात पोहचल्या साधना; दिसले ‘असे’ काही की, मैत्रिणींसमोरच कोसळले रडू

-खरंच की काय! तिसरं लग्न करायला आमिर खान झालाय सज्ज? ‘या’ अभिनेत्रीसोबत रंगलीय लग्नाची चर्चा

हे देखील वाचा