बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर सोनाली पाटीलने देखील धरला ‘नाटू नाटू’ गाण्यावर ठेका


बिग बॉस मराठीच्या घरातून मागील आठवड्यात सोनाली पाटील घराबाहेर गेली आहे. सोनाली घरा बाहेर गेल्याने तिच्या चाहत्यांना खूप दुःख झाले होते. ती जवळपास ९० दिवसापेक्षाही जास्त बिग बॉस मराठीच्या घरात राहिली आहे. त्यामुळे तिची संपूर्ण महाराष्ट्रात आता ओळख निर्माण झाली आहे. याआधी सोनालीने छोट्या मोठ्या मालिकांमध्ये काम केले होते.

तिने ‘वैजू नंबर १’ आणि ‘देवमाणूस या’ मालिकांमध्ये काही काळासाठी पात्र निभावली आहेत. यानंतर तिने बिग बॉसच्या घरात प्रवेश त्यानंतर तिची लोकप्रियता हा हा म्हणता पसरली. आपल्या कोल्हापूरच्या रांगड्या संवाद कौशल्याने आणि तिच्या स्वभावाने तिने सगळ्याचे मन जिंकून घेतले. (Actress sonali patil share her dance video on social media)

घरातून बाहेर पडल्यावर सोनाली आता बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेच्या परफॉर्मन्सची तयारी करण्यात व्यस्त आहे. अशातच तिने सध्या ट्रेंडिंग असणाऱ्या ‘नाटू नाटू’ गाण्यावर व्हिडिओ तयार केला आहे. हा व्हिडिओ तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, सोनालीने जीन्स आणि पिवळ्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे. यावर तिने शर्ट घातला आहे. ती ‘नाटू नाटू’ या गाण्याच्या स्टेप्स फॉलो करताना दिसत आहे.

तिच्या आजूबाजूचा सगळी परिस्थिती पाहता असे वाटत आहे की, ती बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेच्या डान्स प्रॅक्टिसमध्ये आहे. बिग बॉस मराठी ३ चा ग्रँड फिनाले २६ डिसेंबर रोजी होणार आहे. यावेळी या पर्वाचा विजेता घोषित होईल तसेच सगळ्या स्पर्धकांचे डान्स परफॉर्मन्स देखील पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा :

‘गणपत’ सिनेमाचा टिझर प्रदर्शित टायगर श्रॉफच्या अंदाजने केला धमाका, ‘या’ सिनेमा होणार प्रदर्शित

सई ताम्हणकरचे बोल्ड फोटो पाहून, ‘या’ संगीतकाराला देखील आवरला नाही कमेंट करण्याचा मोह, म्हणाला…

आवाजाच्या दुनियेतील जादूगारांनी केली बिग बॉसच्या घरात एन्ट्री, स्पर्धकांना दिले अवघड टास्क 

 

 


Latest Post

error: Content is protected !!