काय ते ठुमके… आहा! अली गोनीच्या ‘तेरा सूट’ गाण्यावर थिरकली सोनाली फोगट, पाहा भन्नाट व्हिडिओ

Actress sonali phogat dance on aly goni and Jasmine bhasin song tera suit


गेल्या काही दिवसांपासून भाजप नेता सोनाली फोगट बरीच चर्चेत असते. नुकतीच तिने ‘बिग बॉस 14’ या लोकप्रिय शोमध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एंट्री घेतली होती. शो दरम्यान सोनाली फोगटची स्टाईल प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनली होती. शोमध्ये सोनाली अली गोनीसोबतच्या अफेयरविषयीही चर्चेत होती. आता तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती अली गोनी आणि जास्मीन भसीन यांच्या ‘तेरा सूट’ गाण्यावर नाचताना दिसत आहे.

काल रात्रीच सोनाली फोगटने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सोनालीचा ‘तेरा सूट’ या नवीन गाण्यावर डान्स पाहून चाहते तिची प्रशंसा करत आहेत. काही दिवसांपूर्वीच अली आणि जास्मीनचे हे गाणे रिलीझ झाले होते.

सोनालीचा हा व्हिडिओ खूप पाहिला जात आहे. व्हिडिओ शेअर करत सोनालीने लिहिले की, “अली गोनी जास्मीन भसीन नवीन गाण्यासाठी या सुंदर जोडप्याचे हार्दिक अभिनंदन.”

अली गोनीने सोनालीच्या पोस्टवर कमेंट केली. अलीने लिहिले, “किलिंग इट.” प्रत्युत्तर म्हणून सोनालीने अलीला “धन्यवाद” म्हटले आहे.

बिग बॉसच्या घरात सोनाली फोगटची अली गोनीशी मैत्री झाली होती. सोनालीने हेही सांगितले की तिला अली खूप आवडतो. हा लव्ह अँगल पाहून सलमान खानने तिला चांगलेच फटकारले होते. सोशल मीडियावरही सोनाली फोगट कमी वयाच्या अली गोनीबरोबर लव्ह अँगल तयार केल्याबद्दल ट्रोल झाली होती. काही युजर्सने त्यांना ‘आई-मुलाची जोडी’ देखील म्हटले होते.

सोनाली फोगट ही भाजपची नेता आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीत तिने हिसार जिल्ह्यातील आदमपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. तथापि, ती निवडणूकीत पराभूत झाली. सोनाली फोगट ही एक अभिनेत्रीही आहे. तिने दूरदर्शनवर बरेच शो होस्ट केले आहेत. याव्यतिरिक्त ती टिक टॉक स्टारही आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आपल्या डान्सने चाहत्यांना वेड लावणारी ‘सपना चौधरी’, तिच्या ‘तेरे ठुमके’ गाण्याला आजही मिळतेय प्रेक्षकांची पसंती

-भोजपुरी गाण्याचा जलवा! सुपरस्टार राकेश मिश्राचं नवीन गाणं यूट्यूबवर करतंय धमाल; एकदा पाहाच

-‘सैयां जी’ गाण्यावर थिरकली निया शर्मा, पण ‘मजा नाही आली ताई’ म्हणत युजर्सने उडवली खिल्ली


Leave A Reply

Your email address will not be published.