Tuesday, April 15, 2025
Home बॉलीवूड सोनमने घालवली कपूर खानदानाची इज्जत! म्हणाली, ‘माझ्या मैत्रिणींसोबत झोपलेत माझे सर्व भाऊ’

सोनमने घालवली कपूर खानदानाची इज्जत! म्हणाली, ‘माझ्या मैत्रिणींसोबत झोपलेत माझे सर्व भाऊ’

करण जोहर होस्ट करत असलेल्या ‘कॉफी विथ करण‘ या शोला प्रेक्षकांची जबरदस्त पसंती मिळत आहे. पहिल्या सिझनपासून ते आतापर्यंतच्या ७व्या सिझनपर्यंत या शोला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले आहे. प्रेक्षकांना कलाकारांच्या आयुष्यात काय सुरूये आणि त्यांच्या गुपीतांविषयी जाणून घेण्यास खूप आवडते. या शोमध्ये कलाकार आपल्या गुपितांचा खुलासा करत असतात. त्यामुळे प्रेक्षक या शोला पसंती दर्शवतात. ‘कॉफी विथ करण’च्या सातव्या सिझनमध्ये सोनम कपूर आणि अर्जुन कपूर यांनीही हजेरी लावली होती. यावेळी सोनमने भाऊ अर्जुनला चांगलेच ट्रोल केले.

सोनमने केले अर्जुनला ट्रोल?
‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan) शोच्या प्रोमोमध्ये सोनम कपूर (Sonam Kapoor) हिने रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याच्यावर निशाणा साधण्यापासून ते तिच्या भावापर्यंत कुणालाही सोडले नाही. तिने या चॅटशोमध्ये आपल्या भावांबद्दल असे खुलासे केले की, अर्जुन कपूर (Arjun Kapoor) याचीही बोलती बंद झाली. सोनमने सांगितले की, तिचे सर्व भाऊ तिच्या मैत्रिणीसोबत झोपले आहेत. कोणीही वाचले नाहीये. सोनमचे हे वाक्य ऐकल्यानंतर अर्जुनही हैराण झाला, त्यानंतर तो प्रश्न उपस्थित करत म्हणाला की, ‘कसली बहीण आहेस तू?’

 

View this post on Instagram

 

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

भावांबद्दल हे काय बोलून गेली सोनम?
करण जोहर (Karan Johar) याने विचारलेल्या प्रश्नावर सोनम म्हणाली की, “मला याबद्दल काहीही बोलायचे नाही. माझ्या भावांमध्ये कोणीही राहिले नाहीये.” सोनमचे बोलणे ऐकून करण म्हणाला की, “कसे भाऊ आहेत तुझे?” तेव्हाच अर्जुनही म्हणाला की, “कसली बहीण आहेस तू? तू आम्हा भावांबद्दल काय बोलत आहेस? मला असं वाटतंय की, मला इथे सोनम कपूरकडून ट्रोल करण्यासाठी बोलावले आहे.”

या प्रोमोवर सोनमचा भाऊ हर्षवर्धन कपूर याचीही प्रतिक्रिया आली. त्याने इंस्टाग्रामवर लिहिले की, “अरे देवा.”

सोनमने या शोमध्ये अनेक मजेशीर खुलासे केले. प्रेक्षक या एपिसोडची आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच, अर्जुनने मलायकाचे नाव मोबाईलमध्ये कोणत्या नावाने सेव्ह केले आहे, याचाही खुलासा केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-
विमानतळावर नेहा कक्करला पाहून चाहतीला कोसळले रडू; नेटकरी म्हणाले, ‘ओव्हरऍक्टिंगचे ५० रुपये कट’
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यालाच आवडत नाहीये त्याचा अभिनय, स्वत:च सांगितले धक्कादायक कारण
भावूक क्षण! अभिनेत्री हिना खानने दिला वडिलांच्या आठवणींना उजाळा, वाढदिवशी केक घेऊन पोहोचली कबरीवर

हे देखील वाचा