Wednesday, March 12, 2025
Home मराठी स्पृहा जोशी-क्षितिष दातेची प्रमुख भूमिका असलेली ‘लोकमान्य’ मालिका होणार बंद? ‘हे’ आहे कारण

स्पृहा जोशी-क्षितिष दातेची प्रमुख भूमिका असलेली ‘लोकमान्य’ मालिका होणार बंद? ‘हे’ आहे कारण

अभिनेत्री स्पृहा जोशी तिच्या अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. इतकचं नाही तर स्पृहा निवेदिका म्हणून देखील प्रेक्षकांसमोर आली आहे. तसेच तिला कवीता करायला खूप आवडतात. स्पृहाची गन एक उत्तम कवयित्री म्हणून केली जाते. स्पृहाने तिचे स्वतःच्या कवितांचे एक पुस्तक देखील प्रकाशित केले आहे. स्पृहाने तिचा मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. आता स्पृहाच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

वर्ष भरापुर्वी झी मराठी वाहिनीवर “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच” अशी सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांची मालिका सुरू झाली होती. या मालिकेच नाव ‘लोकमान्य’ असे आहे. या मालिकेत टिळकांच्या राजकीय प्रवासाबरोबरच त्यांच्या कौटुंबिक आयुष्यातील महत्त्वाचे दिवस देखील दाखवण्यात आले. या मालिकेतून अभिनेता क्षितीज दाते आणि अभिनेत्री स्पृहा जोशी (Spruha Joshi )प्रमुख भूमिकेत झळकल्या.

या मालिकेत स्पृहाने लोकमान्य टिळकांची पत्नी सत्यभामाबाई यांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेता क्षितिष दाते याने लोकमान्य टिळकांची भूमिकेत दिसला आहे. ही मालिका सुरू झाली तेव्हा प्रेक्षकांनी या मालिकेला भरभरून प्रतिसाद दिला. पण आता ही मालिका टिआरपीच्या बाबतीत खाली गेली आहे. त्यामुळे स्पृहाची ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. याबाबत झी मराठी वाहिनीने एक पोस्ट देखील केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad)

या मालिकेचं लेखन आशुतोष परांडकर यांनी केले आहे. तर स्वप्निल वारके हे या मालिकेचे दिग्दर्शक आहेत. दशमी क्रिएशन्स हे या मालिकेचे निर्मिते आहेत. या दरम्यान,लोकमान्य ही मालिका कधी बंद होणार आहे हे अद्यापही समोर आलेले नाही. त्या मालिकेची जागी कोणता नवीन कार्यक्रम सुरू होणार हे अजून समोर आलेलं नाही. पण ही मालिका बंद होणार असल्यामुळे चाहते सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत आहेत. (Actress Spruha Joshi and Kshitish Data’s serial ‘Lokmanya’ will be discontinued)

अधिक वाचा- 
ग्रहण काही संपेना! अनेक वादांशी सामना केलेला आदिपुरुष सिनेमा यूटुबवर लीक, काही तासातच मिलियन व्ह्यूज
अरे बापरे! अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी नवऱ्यासमोर उच्चारला होता ‘तो’ अपशब्द; म्हणाल्या….

हे देखील वाचा