Tuesday, September 26, 2023

अरे बापरे! अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी नवऱ्यासमोर उच्चारला होता ‘तो’ अपशब्द; म्हणाल्या….

बाईपण भारी देवा’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बाॅक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट 30 जूनला प्रेक्षकांंच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शिक केदार शिंदे आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी महिला वर्गाची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. हा चित्रपट जोरदार कमाई करत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी अनेक कलाकरांनी उपस्थिती दर्शवली आहे. चित्रपट पाहिल्यानंतर बऱ्याच जणांनी यावर प्रतिक्रिया दिल्या.

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटत रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा चौधरी या अभिनेत्रींनी मुख्य भूमिकेत झळकल्या आहेत. या चित्रपटात वंदना गुप्ते यांनी साकारलेली भूमिका चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चेत आली. त्याच्या या भूमिकेवरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

वंदना गुप्ते  ( Vandana Gupte ) यांचे पात्र या चित्रपटात खूप डॅशिंग दाखवण्यात आले आहे. त्या खऱ्या आयुष्यात देखाल तितक्याच डॅशिंग आहेत. नुकतचं माध्यमांशी बोलताना वंदना गुप्ते यांनी नवऱ्याबाबतचा एक मोठा गुपित उघडक केल आहे. तुम्ही नवऱ्यासाठी कधी अपशब्द वापरला होता का? असा प्रश्न वंदना गुप्तेंना विचारण्यात आला होता. यावर बोलताना वंदना यांनी दिलेल्या उत्तराची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

वंदना म्हणाल्या की, “मी एकदा माझ्या नवऱ्याला ‘च्यायला’ म्हणाले होते. पण, हा शब्द वापरल्यानंतर माझा नवऱ्याला थोडासुद्धा राग आला नव्हता. पण त्याच्या आईला खूप राग आला होता की नाही हे मला माहित नाही.” त्याच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

तसच, “बाईपण भारी देवा’ चित्रपट बघितल्यानंतर शिरीष गुप्ते यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. त्या विषयी अभिनेत्री वंदना गुप्ते म्हणाल्या की, “हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी शिरीष यांना हा चित्रपट पाहता आला नाही. कारण, त्याचे व्यग्र वेळापत्र. दर्शित झाल्यानंतर तीन-चार दिवसांनी शिरीष यांनी संध्याकाळच्या शोला हा चित्रपट बघितला. शिरीष यांना हा चित्रपट खूप आवडला आहे. हा चित्रपट पाहून झाल्यानंतर ते मला म्हणाला की, मला तुझ्याबद्दल वाटणारा आदर प्रचंड वाढला आहे.”

अधिक वाचा- 
‘गुम है किसी के प्यार में’च्या सेटवर निघाला माेठा अजगर, शक्ती अराेरा याने शेअर केला व्हिडिओ
दीपिकासोबत घटस्फोटाच्या बातम्यांवर रणवीरने लावला ब्रेक, अभिनेत्रीसोबतचा ‘ताे’ रोमँटिक फोटो केला शेअर

हे देखील वाचा