Saturday, April 20, 2024

‘अशी दुखरी गुपितं फार काळ लपत नसतात..’ खुप दिवसांनी स्पृहा जोशीची सुंदर कविता प्रेक्षकांच्या भेटीला

स्पृहा जोशी (Spruha joshi) ही मराठी चित्रपट जगतातील एक लोकप्रिय प्रतिभावान अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते. आपल्या युट्यूब अकाउंटवरुन ती नेहमी विविध विषयांवरील व्हिडिओ,सुंदर कविता ती शेअर करत असते.नुकताच स्पृहाने तिच्या नव्या बकुल नावाच्या कवितेचा व्हिडिओ तिच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे, ज्याला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. 

स्पृहा जोशी तिच्या अभिनयाइतकीच एक उत्तम कवयित्री म्हणूनही सर्वत्र लोकप्रिय आहे. अनेक विषयांवरील सुंदर कविता ती आपल्या चाहत्यांशी शेअर करत असते.तिच्या या सुंदर कवितांची तिच्या चाहत्यांनाही नेहमीच या कवितांची  उत्सुकता लागलेली असते. नुकतीच स्पृहानवे तिची नवीन बकुळा नावाची कविता आपल्या चाहत्यांशी शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने बकुळ फुलाचे तिच्या सुंदर शब्दात वर्णन केले आहे. या कवितेत ती म्हणते की,

“दुधाळ झर्‍याच्या आणि हिरव्या पाऊलवाटेच्या मध्ये तू दिसतेस, थरथरत उभी असलेली. लोक चालत राहतात धुळीतून वाट होत जाते आणखी मळलेली… तू तशीच उभी आहेस.. थोडी मुळं हलवून इकडे तिकडे बघ तरी.. तुझ्या आसपासच्या या मळकट करडेपणात तू किती सुंदर दिसतेयस, मी तुला खूप वर्षं बघतेय..आकाश निळी झालर, पाऊस त्याची रिमझिम, चंद्र मोतिया चांदणं देतो. तू हलत नाहीस पण जागची.. थोडंसं मोहरल्यासारखं दाखवतेस फक्त.. आपण आता इतकं बोलतोय म्हणून, पण पलीकडे हिरवेगार डोंगर आहेत उसळणारा समुद्र आहे.. तुला नाही वाटत एकदा त्यांच्याकडे पहावंसं? त्या मळक्या पाऊलवाटेवरून दूर कुठेतरी जावंसं?”

“पण.. तू आपली तिथेच नेहमी.. दुधाळ झर्‍याच्या आणि हिरव्या पाउलवाटेच्या मध्ये थरथरत उभी.. संध्याकाळच्या वाऱ्याची वाट पहात.. आपण आता इतकं बोलतोय म्हणून, पण.. तुझा आणि संध्याकाळच्या वाऱ्याचा जीव आहे ना एकमेकांवर? मला कसं कळलं? अगं, संध्याकाळचे दुखरे होऊन इतके घमघमता न दोघेही.. आपल्यालाच वाटतं की जातायेता माणसं पहात नसतात.. आपण आता इतकं बोलतोय म्हणून, पण अशी दुखरी गुपितं फार काळ लपत नसतात…” या व्हिडिओच्या शेवटी स्पृहाने ही कविता खूप दिवसांनी सुचलेली आहे त्यामुळे माझ्यासाठीही खूपच खास आहे असेही म्हणले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा