Wednesday, July 2, 2025
Home टेलिव्हिजन बापरे बाप! ‘या’ अभिनेत्रीने रिकामी केली ‘बिग बॉस 16’च्या निर्मात्यांची तिजोरी, बनली सर्वात महागडी स्पर्धक

बापरे बाप! ‘या’ अभिनेत्रीने रिकामी केली ‘बिग बॉस 16’च्या निर्मात्यांची तिजोरी, बनली सर्वात महागडी स्पर्धक

छोट्या पडद्यावरील सर्वात प्रसिद्ध आणि तितकाच वादग्रस्त असलेला ‘बिग बॉस‘ शो चाहत्यांची मने जिंकत आला आहे. कदाचित त्यामुळेच हा शो 16व्या पर्वात पदार्पण करत आहे. या शोचे 16वे पर्व लवकरच छोट्या पडद्यावर चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. यामधील स्पर्धकही जवळपास पक्के झाले आहेत. या स्पर्धकांमध्ये टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री सुंबुल तौकीर खान म्हणजेच ‘इमली’ हिचाही समावेश आहे. सलमान खान याच्या ‘बिग बॉस 16’मधून ती टीव्हीवर पुनरागमन करणार आहे. त्यासाठी तिने तयारीदेखील सुरू केली आहे. अनेकजण तिला शुभेच्छा देत आहेत. यासाठी तिला चांगलेच मानधनही देण्यात आले आहे. असे म्हटले जात आहे की, सुंबुल या पर्वाची सर्वात महागडी स्पर्धक बनली आहे.

अभिनेत्री सुंबुल तौकीर खान (Sumbul Touqeer Khan) हिच्याशी संबंधित प्रोमो व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. यानंतर आता तिच्या मानधनाबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मनोरंजन क्षेत्रात अशी चर्चा आहे की, सुंबुल हिला ‘बिग बॉस 16’मध्ये सर्वाधिक पैसे दिले जात आहेत. ‘बिग बॉस 16’च्या एका फॅनपेजनुसार, सुंबुल हिला प्रत्येक आठवड्यासाठी जवळपास 12 लाख रुपये दिले जात आहेत. मात्र, आतापर्यंत याबाबत ‘बिग बॉस’चे निर्माते किंवा स्वत: सुंबुल हिच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाहीये.

सुंबुलने केली ‘बिग बॉस 16’साठी पँकिंग
सुंबुल हिने ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) शोसाठी पँकिंग केली आहे. याची माहिती तिने स्वत: तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमधून दिली आहे. या स्टोरीमध्ये तिच्या सूटकेसमध्ये खूप साऱ्या वस्तू दिसत आहेत. हा फोटो शेअर करत तिने लिहिले की, “नवीन प्रवासाची सुरुवात.” खरं तर, सुंबुल देखील या शोचा भाग बनण्यासाठी खूपच उत्सुक आहे.

Sumbul-Touqeer
Photo Courtesy Instagramsumbul touqeer

हेही वाचा- सैफची भाची झाली 5 वर्षांची, इनाया अन् तैमूरचा फोटो शेअर करत करीना म्हणाली, ‘तुम्हाला सगळं मिळो’

‘बिग बॉस 16’साठी ‘या’ कलाकारांची निवड
खरं तर, सुंबुल तौकीर खान हिच्यासोबतच ‘बिग बॉस 16’ या शोसाठी निम्रत कौर आहलुवालिया, सौंदर्य शर्मा, रॅपर मॅक स्टेन आणि अब्दू रोजिक या कलाकारांचीही निवड झाली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
फोटोत दिसणाऱ्या ‘या’ चिमुकलीला ओळखलं का? 12 वर्षांच्या वयातच धरलेली अभिनयाची कास; तिचीच रंगलीय चर्चा
‘सामी सामी’ गाण्यावर रश्मिकाचा सलमानसोबत झक्कास डान्स, ‘श्रीवल्ली’च्या इशाऱ्यांवर ‘दबंग खान’ने धरला ठेका

हे देखील वाचा