Saturday, July 27, 2024

फोटोत दिसणाऱ्या ‘या’ चिमुकलीला ओळखलं का? 12 वर्षांच्या वयातच धरलेली अभिनयाची कास; तिचीच रंगलीय चर्चा

सोशल मीडियावर नेहमीच कलाकारांचे बालपणीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. आपण त्या कलाकारांचे सिनेमे पाहिलेले असतात, पण तरीही त्यांचे बालपणीचे फोटो पाहून आपल्याला चटकन त्यांना ओळखता येत नाही. आताही कदाचित असंच काहीसं झालं आहे. बॉलिवूड गाजवणाऱ्या दिग्गज अभिनेत्रीचा एक फोटो ब्लॅक अँड व्हाईट फोटो जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोत दिसणाऱ्या मुलीच्या डान्सशी प्रभावित होऊन दिग्गज चित्रपट निर्मात्यांनी तिला बालकलाकार म्हणून आपल्या सिनेमात घेतले होते. जेव्हा ही मुलगी मोठी झाली, आणि तिने अभिनेत्री बनण्याचा विचार केला, तेव्हा तिच्यात अभिनेत्रीचे गुण नाहीत म्हणून तिला नाकारण्यात आले. मात्र, थोड्याच दिवसात ही अभिनेत्री इंडस्ट्रीची मुख्य अभिनेत्री बनली आणि तिने नाकारणाऱ्या निर्मात्यांना प्रत्युत्तर दिले.

या अभिनेत्रीचा इंडस्ट्रीतील दबदबा अनेक वर्षे तसाच राहिला. आता ही अभिनेत्री 80 वर्षांच्या वयात पदार्पण करणार आहे. विशेष म्हणजे, तिला मोठ्या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, त्या अभिनेत्रीबद्दल कदाचित तुम्हाला समजले असेल. ही अभिनेत्री इतर कुणी नसून आशा पारेख (Asha Parekh) या आहेत. त्यांना 30 सप्टेंबर रोजी ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने गौरवण्यात येणार आहे. 2 ऑक्टोबर रोजी आशा आपला 80वा वाढदिवस साजरा करणार आहेत. विशेष म्हणजे, त्यांना वाढदिवसाच्या 2 दिवसांआधी भारत सरकार त्यांचा या मोठ्या पुरस्काराने सन्मान करणार आहेत.

‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’साठी आशा पारेख यांची निवड
हिंद सिनेसृष्टीतील दमदार आणि यशस्वी अभिनेत्री असलेल्या आशा पारेख यांनी त्यांच्या अभिनय कारकीर्दीत एकापेक्षा एक सिनेमे दिले आहेत. त्यामध्ये ‘दिल दे के देखो’, ‘कारवां’, ‘आन मिलो सजना’, ‘कटी पतंग’, ‘समाधि’, ‘मैं तुलसी तेरे आंगन की’ आणि ‘लव्ह इन टोकियो’ यांसारख्या सिनेमात काम करून आपला ठसा उमटवला. सिनेजगतातील आशा पारेख यांचे अनन्यसाधारण योगदान पाहता तब्बल 37 वर्षांनंतर एखाद्या अभिनेत्रीची निवड ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’साठी करण्यात आली आहे.

हेही वाचा- लग्नाच्या 4 वर्षांनंतर रणवीर अन् दीपिकाचं बिनसलं? वेगळे होण्याच्या बातम्यांवर स्पष्टच बोलला ‘एनर्जी किंग’

बिमल रॉय यांनी बनवले होते बालकलाकार
आशा पारेख यांना बालपणापासूनच नृत्याची आवड होती. 12 वर्षांच्या चिमुकल्या आशाजींना थिरकताना पाहून आई सुधा म्हणजेच सलमा पारेख यांनी कथ्थक आणि भरतनाट्यम याचे धडे आशाजींना दिले. एकदा आशा यांना स्टेज शोदरम्यान डान्स करताना पाहून बिमल रॉय हे इतके प्रभावित झाले की, त्यांनी त्यांच्या ‘बाप बेटी’ या सिनेमात बालकलाकार म्हणून आशाजींची निवड केली. 1954 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बाप बेटी’ या सिनेमानेच आशाजींच्या मनात अभिनेत्री बनण्याची इच्छा जागी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-
चाळीशी नंतरही सर्वांना हेवा वाटावा, असा फिटनेस ठेवणाऱ्या शिल्पा शेट्टीचे ‘हे’ वेड लावणारे फोटो…
जगाला अहिंसेचा धडा देणाऱ्या महात्मा गांधीजींच्या आयुष्यावर आधारित सिनेमे, एका क्लिकवर पाहा यादी

हे देखील वाचा