Friday, April 19, 2024

‘सामी सामी’ गाण्यावर रश्मिकाचा सलमानसोबत झक्कास डान्स, ‘श्रीवल्ली’च्या इशाऱ्यांवर ‘दबंग खान’ने धरला ठेका

चित्रपटसृष्टी कोणतीही असो, त्यातील सिनेमांमध्ये असणारी गाणी नेहमीच प्रेक्षकांचे लक्ष वेधत असतात. काही सिनेमांतील गाणी ही जगभरात व्हायरल होतात. या व्हायरल होणाऱ्या गाण्यांमध्ये साऊथ इंडस्ट्रीतील गाणी सर्वाधिक असल्याचे दिसते. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना अभिनित ‘पुष्पा‘ हा सिनेमाही त्याचाच एक भाग. या सिनेमातील ‘सामी सामी’ हे गाणे फक्त टॉलिवूडच नाही, तर जगभरात प्रसिद्ध झाले. या गाण्यावरील अनेक डान्स व्हिडिओ, रील्स व्हायरल होत असतात. या गाण्यावर थिरकण्याचा मोह कुणालाही आवरत नाही. अशात बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खान कसा मागे राहील बरं. सलमान आणि रश्मिकाचा ‘सामी सामी’ गाण्यावरील डान्स व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

सलमान आणि रश्मिका एकत्र
एका पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिने ग्लॅमरस एन्ट्री केली. रश्मिकाने तिच्या सुंदरतेने सोहळ्याची शोभा वाढवली. तसेच, तिने सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) याच्यासोबत ‘पुष्पा’ या सिनेमातील ‘सामी सामी’ (Saami Saami) या गाण्यावरही डान्स केला.

सलमान आणि रश्मिकाचा ‘सामी सामी’ गाण्यावर डान्स
एका व्हायरल व्हिडिओत रश्मिका ‘सामी सामी’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिच्यासोबत सलमान आणि शोचा होस्ट मनीष पॉल हेदेखील थिरकताना दिसत आहेत. अभिनेत्री बुधवारी (दि. 28 सप्टेंबर) एका पुरस्कार सोहळ्यात हजर झाली होती. या सोहळ्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहत्यांनाही हा डान्स व्हिडिओ भलताच आवडला असून तेदेखील शेअर करत आहेत.

हेही वाचा- दु:खद! ग्रॅमी पुरस्कार विजेत्या गायकाचे निधन, वयाच्या 59व्या वयात घेतला जगाचा निरोप

लहान मुलीने जिंकले रश्मिकाचे मन
‘सामी सामी’ या गाण्यावरील डान्स व्हिडिओ व्हायरल होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही रश्मिकाने स्वत: एका लहान मुलीचा व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती ‘पुष्पा’ या गाण्यातील ‘सामी सामी’ गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. त्या मुलीचे डान्स मूव्हज पाहून रश्मिकाही तिच्यावर फिदा झाली होती. रश्मिकाने ट्वीट रिट्विट करत म्हटले होते की, “या लहान मुलीने माझा दिवस खास बनवला. मला तिला तिची भेट घ्यायची आहे. कशी घेऊ?”

‘पुष्पा’ या बजेट होते 400 कोटी रुपये
‘पुष्पा’ या सिनेमाबद्दल बोलायचं झालं, तर हा सिनेमा डिसेंबर 2021मध्ये प्रदर्शित झाला होता. तेलुगू भाषेतील हा सिनेमा हिंदी पट्ट्यातही चांगलाच गाजला होता. या सिनेमाने हिंदी पट्ट्यात 100 कोटी रुपयांची कमाई केली होती. असेही म्हटले जात आहे की, सिनेमाचे बजेट 400 कोटी रुपये होते. आता चाहत्यांना ‘पुष्पा 2’ या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अबब! शाहिद कपूरने खरेदी केला ‘इतक्या’ कोटींचा बंगला, किंमत ऐकून तुमचेही होतील डोळे पांढरे
लग्नाच्या 4 वर्षांनंतर रणवीर अन् दीपिकाचं बिनसलं? वेगळे होण्याच्या बातम्यांवर स्पष्टच बोलला ‘एनर्जी किंग’

हे देखील वाचा